मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रुग्णालयातूनही गांगुलीने केलं काम, IPL गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत सहभागी

रुग्णालयातूनही गांगुलीने केलं काम, IPL गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत सहभागी

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला गुरूवारी वूडलॅन्ड्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पण त्याआधी झालेल्या आयपीएल (IPL) गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीला त्याने रुग्णालयातूनच हजेरी लावली होती.

पुढे वाचा ...

कोलकाता, 9 जानेवारी : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला गुरूवारी वूडलॅन्ड्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पण तरीही पुढचे काही दिवस तो 24 तास डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली असेल. दोन-तीन आठवड्यांनंतर पुन्हा एकदा त्याची तपासणी होणार आहे. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिकडे त्याच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली.

इंडिया टु़डेने दिलेल्या वृत्तानुसार रुग्णालयात दाखल असतानाही गांगुलीन 5 जानेवारीला झालेली आयपीएल (IPL) गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत सहभागी झाला. थकवा असल्यामुळे गांगुली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याऐवजी ऑडियो कॉलवरून रुग्णालयातून बैठकीसाठी उपलब्ध झाला.

मागच्या आठवड्यात 2 जानेवारीला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे गांगुलीला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. सौरव गांगुलीच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाले होते. यातल्या एक ब्लॉक 90 टक्के होता. गांगुलीला घरी ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना छातीत दुखायला लागलं, त्यामुळे त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं.

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सगळ्या 8 टीमना 21 जानेवारीपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. तसंच 4 फेब्रुवारीला ट्रेडिंग विन्डो म्हणजेच खेळाडूंची अदलाबदली बंद होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात छोटेखानी लिलाव होईल.

First published: