India vs Australia : '...तरच रोहित शर्माला टीम इंडियात जागा', ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी गांगुलीचं मोठं विधान

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी नुकत्याच एका मुलखतीदरम्यान या दौऱ्याबाबत माहिती दिली. तसेच दुखापतीमुळे वगळण्यात आलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) संधी मिळणार का? या प्रश्नाचेही उत्तर दिले.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी नुकत्याच एका मुलखतीदरम्यान या दौऱ्याबाबत माहिती दिली. तसेच दुखापतीमुळे वगळण्यात आलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) संधी मिळणार का? या प्रश्नाचेही उत्तर दिले.

  • Share this:
    नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) भारतीय संघ ऑस्ट्रेलिया (India tour of Australia) दौऱ्यावर जाणार आहे. 27 नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने, तीन टी-20 आणि 4 टेस्ट मॅच खेळणार आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी नुकत्याच एका मुलखतीदरम्यान या दौऱ्याबाबत माहिती दिली. तसेच दुखापतीमुळे वगळण्यात आलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) संधी मिळणार का? या प्रश्नाचेही उत्तर दिले. गांगुलीनं या मुलाखतीत सांगितले की, ऑस्ट्रेलियामध्ये या संघाविरुद्ध खेळणं नेहमीच आव्हानात्मक असते. स्मिथ आणि वॉर्नर संघात असल्यामुळे संघ आणखी मजबूत असेल. भारतीय संघासाठी ही महत्त्वाची परीक्षा असेल. वाचा-India vs Australia : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जारी, या दिवशी होणार डे-नाइट टेस्ट '...तर रोहित-इशांतला मिळणार संधी' यावेळी भारतीय संघाची निवड करताना अनुभवी आणि युवा अशा दोन्ही खेळाडूंनी संधी दिली आहे. मात्र हिटमॅन रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांची निवड करण्यात आलेली नाही आहे. दोन्ही खेळाडू जमखी आहे. एकीकडे रोहित शर्मा आयपीएलसाठी युएइमध्ये आहे. रोहित सराव करताना दिसत असला तरी त्यानं गेले 3 सामने खेळळे नाही आहेत. त्यामुळे रोहित आणि इशांतबाबत विचारले असता गांगुली म्हणाला की, " आम्ही इशांत आणि रोहितवर लक्ष ठेवून आहोत. इशांत पूर्णत: आउट झाला नाही आहे, कसोटी मालिकेसाठी त्याला संघात घेऊ शकतो. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट व्हावा असे आम्हाला वाचते, जर तो फिट असेल तर नक्की त्याचा विचार होईल". वाचा-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, जखमी रोहित शर्मा संघाबाहेर भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौरा पहिली ODI : 27 नोव्हेंबर सिडनी दुसरी ODI : 29 नोव्हेंबर - सिडनी तिसरी ODI : 02 डिसेंबर - कॅनबरा पहिली टी20 : 04 डिसेंबर - कॅनबरा दुसरी टी20 : 06 डिसेंबर - सिडनी तिसरी टी20 : 08 डिसेंबर - सिडनी पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - एडिलेड दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन
    Published by:Priyanka Gawde
    First published: