BCCI अध्यक्ष सौरव गांगुली शास्त्रींना लावणार कामाला, देणार नवी जबाबदारी

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौरव गांगुली आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे आणखी एक जबाबदारी सोपवणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 11:36 AM IST

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली शास्त्रींना लावणार कामाला, देणार नवी जबाबदारी

कोलकाता, 01 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सौरव गांगुली आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे आणखी एक जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. गांगुलीने म्हटलं आहे की, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये एक अशी व्यवस्था तयार करण्यात येईल की रवी शास्त्री इथं जास्त वेळ घालवू शकतील .बीबीसीआय बेंगळुरूत एका मोठ्या क्रिकेट अकादमीची उभारणी करत आहे. गांगुली आणि इतर नव्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी एनसीए प्रमुख राहुल द्रविड आणि इतर सदस्यांसोबत चर्चा केली होती.

गांगुली म्हणाला की, आम्ही अशी व्यवस्था तयार करू इच्छितो ज्यामुळे रवी शास्त्री जोपर्यंत प्रशिक्षक आहेत तोपर्यंत जास्ती जास्त वेळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला देतील. इथं एक चांगलं सेंटर तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच ते एनसीए प्रमुख आहेत. प्रत्यक्षात एनसीए कसं काम करतं हे जाणून घ्यायचं होतं. सध्या आम्ही नवीन एनसीए तयार करत आहे. मी त्यांना वेगवेगळं भेटलो आहे. मला वाटतं की ते एनसीएमध्ये खूप काम करत आहेत.

शास्त्री आणि गांगुली यांच्यातील संबंध चांगले नाहीत हे उघड आहे. 2016 मध्ये अनिल कुंबळेला प्रशिक्षक केल्यानंतर हे उघड झाले होते. त्यावेळी प्रशिक्षक निवडीसाठीच्या समितीमध्ये सचिन, लक्ष्मण आणि गांगुली होते. त्यावेळी शास्त्री आणि कुंबळे यांच्यापैकी कुंबळेची निवड करण्यात आली होती.

प्रशिक्षक निवडीवेली शास्त्रींच्या मुलाखतीवेळी गांगुली उपस्थित राहिली नव्हता. हे अपमानास्पद असल्याचं शास्त्रींनी म्हटलं होतं. त्यावर गांगुलीने जोरदार प्रत्युत्तर देत शास्त्री वेगळ्याच जगात आहेत असं म्हटलं होतं.

वाचा : भारतातल्या क्रिकेटच्या ऐतिहासिक पर्वाला सुरुवात; होणार पहिला डे/नाईट कसोटी सामना

Loading...

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 11:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...