मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

लॉकडाऊननंतर 'या' 4 टप्प्यात विराटसेना करणार कमबॅक, BCCIचा प्लॅन तयार

लॉकडाऊननंतर 'या' 4 टप्प्यात विराटसेना करणार कमबॅक, BCCIचा प्लॅन तयार

कोरोना व्हायरसने साऱ्या जगात दहशत पसरवली असताना भारतातही कोरोनाचे शिरकाव केला आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता भार-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय दौराही स्थगित करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसने साऱ्या जगात दहशत पसरवली असताना भारतातही कोरोनाचे शिरकाव केला आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता भार-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय दौराही स्थगित करण्यात आला आहे.

जवळजवळ दोन महिने सर्व क्रिकेटपटू आपल्या घरांत कैद आहेत. मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका रद्द झाल्यानंतर भारतीय संघानं एकही सामना खेळलेला नाही आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 14 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परिणामी सर्व क्रिकेट स्पर्धा सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. जवळजवळ दोन महिने सर्व क्रिकेटपटू आपल्या घरांत कैद आहेत. मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका रद्द झाल्यानंतर भारतीय संघानं एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळं विराटसेना सध्या घरातच आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. दरम्यान बीसीसीआयच्या वतीनं खेळाडूंना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी चार टप्प्यात भारतीय संघ पुन्हा मैदानात कसा उतरेल, यासाठी तयारी केली आहे. यामध्ये 4 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये टीम इंडियाला पुन्हा मैदानात उतरवले जाऊ शकते. पहिला टप्पा- लॉकडाऊनमध्ये बीसीसीआयच्या वतीनं खेळाडूंकडे एक प्रश्नावली भरून घेतली आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडे कोणत्या सुविधा आहेत, याची माहिती घेण्यात आली. जसे की, मोहम्मद शमी सध्या आपल्या फॉर्महाऊसवर आहे, त्यामुळं त्याच्याकडे व्यायामासाठी जास्त जागा आहे. तर काही खेळाडू आपल्या घरात कैद आहे, ज्यांच्याकडे छोटी जिम आहे. टीम इंडियाचे फिजियोथेरेपिस्‍ट नितिन पटेल आणि ट्रेनर निक बेव यांना खेळाडूंशी जोडण्यात आले आहे. फलंदाज आणि गोलंदाज यांचा रोज एक सेशन कोचसोबत करावे लागते. मुख्य कोच रवी शास्त्रीही खेळाडूंवर नजर ठेवून आहेत. दुसरा टप्पा-लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर काही बदल केले जाऊ शकतात. खेळाडूंना गटा-गटांमध्ये मैदानावर पाठवले जाऊ शकते. तिसरा टप्पा-बीसीसीआय सध्या खेळाडूंसाठी खास सुविधा तयार करत आहे. यासाठी सध्या एक ब्लूप्रिंट तयार केली जात आहे. लॉकडाऊन हटवल्यानंर एक प्रोग्राम जारी केला जाईल. चौथा टप्पा-क्रिकेट पुन्हा सुरू करण्याआधी बीसीसीआय खेळाडूंच्या फिटनेस आणि मानसिकतेवर विशेष काम करणार आहे. संबंधित बातम्या-VIDEO : RCBची साथ सोडणार विराट? कॅप्टन कोहलीलं स्वत: दिलं उत्तर LIVE मॅचमध्ये बिघडलं होतं केदारचं पोट आणि..., हरभजनने सांगितला मजेदार किस्सा चहलनं अनुष्काकडे केली होती ‘ही’ खास मागणी, आता विराटनं त्यालाच केलं ट्रोल
First published:

Tags: BCCI, Cricket, Team india

पुढील बातम्या