मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /फिक्सिंग रोखण्यासाठी BCCI चे 'ब्रम्हास्त्र', खेळाडूंच्या अडचणी वाढणार!

फिक्सिंग रोखण्यासाठी BCCI चे 'ब्रम्हास्त्र', खेळाडूंच्या अडचणी वाढणार!

मॅच फिक्सिंग (Match fixing in Cricket) रोखण्यासाठी बीसीसीआय (BCCI) कठोर नियम करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या एण्टी करप्शन युनिट म्हणजेच एसीएसयूने (ACSU) काही प्रस्ताव दिले आहेत, ज्यामुळे खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात.

पुढे वाचा ...

मुंबई, 18 डिसेंबर : मॅच फिक्सिंग (Match fixing in Cricket) रोखण्यासाठी बीसीसीआय (BCCI) कठोर नियम करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या एण्टी करप्शन युनिट म्हणजेच एसीएसयूने (ACSU) काही प्रस्ताव दिले आहेत, ज्यामुळे खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात. बीसीसीआयच्या एसीएसयूचे प्रमुख शब्बीर हुसैन (Shabir Hussein) यांनी बोर्डासमोर हा प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये हायटेक सुरक्षेची यंत्र आणि स्नूप म्हणजेच हेरगिरी करणाऱ्या यंत्रांची मागणी करण्यात आली आहे. या यंत्रांच्या माध्यमातून खेळाडू आणि अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचा एसीएसयूचा मानस आहे.

मॅच फिक्सिंग रोखण्यासाठी एण्टी करप्शन युनिटच्या या प्रस्तावावर खेळाडूच नाही तर बीसीसीआयचे अधिकारीही नाखूश असतील. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याची पुष्टीही केली आहे. 'शब्बीर हुसैन यांनी खूप गोष्टींचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, पण आम्ही याची समीक्षा करत आहोत. याबाबत काही सहमती बनू शकते, पण काही गोष्टींवर चर्चा केली जाईल, त्यामुळे चर्चेनंतरच आम्ही यावर बोलू शकतो,' असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

बोर्ड खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही काळजी घेऊ इच्छिते, असंही अधिकाऱ्याने सांगितलं. कर्नाटकचा एक रणजी खेळाडू म्हणाला, 'मॅच फिक्सिंग अजूनही होतं, यामध्ये कोणतंही दुमत नाही. बीसीसीआयने कितीही कडक नियम करूदेत, पण मी स्वत:वर लक्ष ठेवण्यामुळे खूश असेन? फिक्सिंग रोखण्यासाठीची यंत्र खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यासाठीच धोकादायक ठरू नयेत.'

गुजरातचे डीजीपी राहिलेल्या एसीएसयू प्रमुख शब्बीर यांना 4 डिसेंबरला झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत फिक्सिंगबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. आपण स्थानिक क्रिकेटमधलं फिक्सिंग कसं रोखू शकतो? असं बीसीसीआय अधिकाऱ्यांनी शब्बीर यांना विचारलं, तेव्हा त्यांनी अशाप्रकारची यंत्र वापरण्याचा सल्ला दिला, यामध्ये मोबाईल फॉरेन्सिक आणि हेरगिरी करणाऱ्या यंत्रांचा समावेश आहे. याशिवाय स्पाय कॅमेरा आणि रेकॉर्डरही या यंत्रांमध्ये आहेत. बीसीसीआयने या यंत्रांबाबत अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही.

First published:

Tags: BCCI