Home /News /sport /

टीम इंडियाची T20 World Cup ची जोरदार तयारी, दोन बड्या टीमविरुद्ध खेळणार

टीम इंडियाची T20 World Cup ची जोरदार तयारी, दोन बड्या टीमविरुद्ध खेळणार

टीम इंडियाने (Team India) टी-20 वर्ल्ड कपसाठीची (ICC T20 World Cup) जोरदार तयारी सुरू केली आहे. यावर्षी वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार आहे. त्याआधी भारतात दोन टी-20 सीरिज खेळवण्याचा बीसीसीआयचा (BCCI) प्रयत्न आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 मार्च : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपसाठीची (ICC T20 World Cup) जोरदार तयारी सुरू केली आहे. यावर्षी वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार आहे. त्याआधी भारतात दोन टी-20 सीरिज खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. 2007 नंतर भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही, त्यामुळे यंदा कोणतीही कमी ठेवण्यासाठी बीसीसीआय (BCCI) आणि टीम इंडिया (Team India) तयार नाही. विराटच्या नेतृत्वातही भारताला अजून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार ऑक्टोबर महिन्यात भारत दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) द्विपक्षीय टी-20 सीरिज खेळेल. या दोन्ही टीम वर्ल्ड कप आधी भारतात टी-20 सीरिज खेळण्यासाठी भारतात येऊ शकतात. दोन्ही देशांशी याबाबत चर्चा सपरू असल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. मागच्या वर्षी भारत आणि दक्षिण आफ्रिकेची सीरिज कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आली होती. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजनंतर भारत वर्ल्ड कपआधी एकही टी-20 सीरिज खेळणार नाही, त्यामुळे या दोन सीरिजसाठी बीसीसीआय आग्रही आहे. आयपीएलनंतर (IPL 2021) भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळण्यासाठी इंग्लंडला जाईल. 18 ते 22 जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ही फायनल होईल. यानंतर भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. तसंच आशिया कपवरही (Asia Cup) संकट आहे, कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या कालावधीमध्ये पीएसएल खेळवायचं आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंडची टीम भारतात टेस्ट सीरिज खेळणार आहे, तर डिसेंबर-जानेवारीमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी या दोन्ही सीरिज महत्त्वाच्या आहेत, कारण दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने भारताला घरातचं हरवलं आहे. या दोन्ही देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असल्यामुळे त्यांना भारतातल्या खेळपट्ट्याही माहिती आहेत, पण दोन्ही टीमना अजून एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, India vs england, IPL 2021, New zealand, South africa, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या