IPL 2020 : गांगुलीचा आणखी एक धमाका, IPLमध्ये येणार टशन वाढवणारा नवा नियम

IPL 2020 : गांगुलीचा आणखी एक धमाका, IPLमध्ये येणार टशन वाढवणारा नवा नियम

आयपीएल 2020मध्ये होणार मोठे बदल, नवे नियम होणार लागू.

  • Share this:

मुंबई, 04 ऑक्टोबर : बीसीसीआयच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या इंडियन प्रिमीअर लीगची (IPL) प्रसिध्दी कोणापासून लपून राहिलेली नाही. आयपीएलचा प्रत्येक हंगाम एक नवीन विक्रम प्रस्थापित करत असतो. आयपीएल 2020ला महिन्यांचा कालावधी उरला असताना डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी आता आयपीएलच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आतापर्यंत आयपीएलच्या 12व्या हंगामात विविध बदल करण्यात आले, मात्र आता 13वा हंगामाचे स्वरुप हे मोठे असणार आहे. दरम्यान बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलचे सामने रोमाचंक करण्यासाठी वेगवेगळे नियम लावले जातात, त्यानुसार आता पुन्हा एकदा बीसीसीआयच्या वतीनं नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे.

बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलमध्ये आता पॉवर प्लेअर हा नियम लागू करण्यात येऊ शकतो. या नियमामुळं प्रत्येक संघात 15 खेळाडूंची निवड होऊ शकते. त्यामुळं 11 खेळाडू मैदानावर असतील आणि 4 खेळाडू प्लेयिंग इलेव्हनमध्येच असतील पण संघात त्यांना गरज पडेल तसे, घेण्यात येईल.याआधी फक्त क्षेत्ररक्षण करण्यासाठी फक्त इतर खेळाडू उतरत होते, आता हे चार खेळाडू बदली खेळाडू म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी उतरतील.

दरम्यान, बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुली यानं क्रिकेटमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. याआधी डे-नाईट कसोटी सामन्याला मंजूरी देत गांगुलीनं मोठा निर्णय घेतला. बांगलादेश विरोधात भारत पहिला डे-नाईट सामना खेळणार आहे. त्यानंतर गांगुलीनं भारत-बांगलादेश यांच्यातील पहिला टी-20 सामन्याला झालेल्या विरोधातनंतरही दिल्लीतच सामना खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं गांगुलीच्या अध्यक्षतेखाली क्रिकेटमध्ये मोठे बदल होत आहेत.

वाचा-घरच्या मैदानात पुरुषांनी गमावलं तर विदेशात महिलांनी कमावलं!

आयएएनएसला बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांन दिलेल्या माहितीत, “मंगळवार (5 नोव्हेंबर) रोजी बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलच्या समितीपुढे याबाबत चर्चा होईल. आयपीएलच्या आधी हा नियम सैयत मुश्ताक अली टी-20 स्पर्धेल लागू केला जाऊ शकतो”, असे सांगितले.

वाचा-क्रिकेटमधला अनोखा योगायोग, पती-पत्नीच्या कामगिरीची चर्चा होतेय व्हायरल

आता प्लेयिंग इलेव्हन नाही तर फिफ्टिन

या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत, “हा निर्णय घेण्या मागचे मुख्य कारण म्हणजे जे खेळाडू अकरा खेळाडूंमध्ये नसतात त्यांनाही खेळण्याची संधी मिळावी. त्यामुळं स्पर्धेत 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा होणार आहे. यातील बाकी चार खेळाडू कधीही गोलंदाजी किंव फलंदाजीमध्ये संघाचे रुप पालटू शकतात. त्यामुळं प्राथमिक स्वरूपात मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हा नियम लागू करणार आहोत”, असे सांगितले.

वाचा-पंतनं दिला धोका आणि मैदानात सुरु झाला धोनी...धोनीचा जयघोष!

असा आहे नियम

हा नियम सर्व संघाबरोबर चाहत्यांसाठीही रोमांचक असणार आहे. कारण बॅंचवर बसणारे खेळाडूही सामना खेळू शकतात. एकटा खेळाडू संघाचे रुपडे बदलू शकतात. जर शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावा हव्या असतील तर संघातील खेळाडू फिट नसतील तर आक्रमक खेळाडू मैदानात उतरतील. त्यामुळं सामन्याचे रुप बदलू शकते. त्यामुळं अकरा खेळाडूंच्या संघात आक्रमक खेळाडू नसतील आणि बाहेर बसलेल्या 4 खेळाडूंमध्ये आक्रमक असतील तर त्यापैकी एका खेळाडूला संधी मिळू शकते.

वाचा-हाच तो क्षण, हीच ती चुक! अन् भारतानं गमावला सामना; पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 04:32 PM IST

ताज्या बातम्या