मोहम्मद शमीच्या अटक वॉरंटवर BCCIने दिली प्रतिक्रिया म्हणाले...

मोहम्मद शमीच्या अटक वॉरंटवर BCCIने दिली प्रतिक्रिया म्हणाले...

शमीची पत्नी हसीन जहाँनं कौटुंबिक हिंसा केल्याचा आरोप त्याच्यावर केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : पश्चिम बंगालच्या अलीपू न्यायलात भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हासिब अहमग यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.शमीची पत्नी हसीन जहाँनं कौटुंबिक हिंसा केल्याचा आरोप त्याच्यावर केला होता. दरम्यान सध्या शमी वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळत आहे. तर, न्यायालयानं आत्मसमर्पण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणात आता बीसीसीआयनं मोठे वक्तव्य केले आहे. बीसीसीआयनं आपल्या दिलेल्या माहितीत, शमीवर केलेल्या आरोपांचे आरोपपत्र पाहिल्याशिवाय त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळ शमीला काहिसा दिलासा मिळाला आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत, “या प्रकरणात त्वरित कारवाई करणे योग्य होणार नाही. सध्या शमी वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघासोबत खेळत आहे. हा दौरा 3 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल”, असे सांगितले.

वाचा-टीम इंडियाच्या जलद गोलंदाजाविरोधात अटक वॉरंट, विराटचे टेंशन वाढलं!

शमीवर केले होते गंभीर आरोप काय आहे प्रकरण

2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मारहाण केल्याचा, अन्याय आणि अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसेच हुंड्यासाठी पैसे मागितल्याचाही आरोप केला होता. हसीन जहाँने शमीचे फेसुबक आणि व्हॉट्स अॅप चॅटही प्रसारमाध्यमांसमोर आणले होते. शमीचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत असाही आरोप हसीनने केला होता. हसीन जहाँने फक्त शमीविरोधातच नाही तर त्याच्या कुटुंबीयांविरोधातही तक्रार दाखल केली होती. हुंड्यासाठी कौटुंबिक हिंसाचार करण्यात आला असा आरोप तिने केला होता. हसीन जहाँने तिचा पती मोहम्मद शम्मीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यासोबतच अनेक गंभीर आरोप केले आहेत.

वाचा-सरकारी नोकरीत विचारला गेला धोनीवर अजब प्रश्न, नेटकरी झाले हैरान

या प्रकरणी शमीवर गुन्हा दाखल

हसीन जहाँने शम्मी मॅच फिक्सिंगमध्येही सामील असल्याची शक्यता व्यक्त केली. आता या सगळ्या प्रकरणांपैकी हुंडा मागणे आणि लैंगिक छळ करणे या दोन प्रकरणात मोहम्मद शमीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही बाब निश्चितच शमीच्या अडचणी वाढवणारी ठरली आहे.

वाचा-वेस्ट इंडिजमधून आली मोठी बातमी, भारतीय संघाला आहे धोका!

Video: 'राजे, भाजपमध्ये गेलाच तर माझ्या शुभेच्छा'

Published by: Akshay Shitole
First published: September 2, 2019, 9:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading