नवी दिल्ली, 06 एप्रिल : स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या श्रीसंतकडे आता कमबॅक करण्याची एक संधी चालून आली आहे. याआधी निलंबनाची कारवाई सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच उठवली. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आता निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार बीसीसीआयचे लोकपाल जस्टिस (निवृत्त) डी के जैन हे श्रीसंतच्या शिक्षेबाबत पुढील निर्णय घेणार आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत लोकपालांनी श्रीसंतच्या शिक्षेबाबत निर्णय घेणे बंधनकारक असणार आहे, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
2013च्या आयपीएलदरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर श्रीसंतवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं दाखल केलेल्या याचिकेवर आता श्रीसंतबाबत निर्णय लोकपालांनी घ्यावा असा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 15 मार्चला बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने श्रीसंतवर लावलेली आजीवन बंदी उठवली होती.
काय होते श्रीसंतचे प्रकरण ?
2013च्या आयपीएलच्या हंगामात राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळत असताना श्रीसंतला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपवरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं श्रीसंतवर आजीवन बंदी घातली. तसेच, 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचाही निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयानं नुकतीच ही बंदी उठवली.
VIDEO: दानवेंची पुन्हा एकदा 'गलती से मिस्टेक'; पाहा काय म्हणाले..