'त्या' कॉफीवरुन हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांना लोकपालांकडून नोटीस जारी

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले लोकपाल पुढील चौकशी करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 02:26 PM IST

'त्या' कॉफीवरुन हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांना लोकपालांकडून नोटीस जारी

नवी दिल्ली, 1 एप्रिल : 'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या टॉक शोमध्ये महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या विरुद्ध राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे या दोघांच्या अडचणीत भर पडली आहे. बीसीसीआयनं याआधी पांड्या आणि राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागली होती. काही महिन्यांनंतर या दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती. दरम्यान या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले लोकपाल पुढील चौकशी करत आहेत.या प्रकरणाची चौकशी करत आहेत. यासंबंधी लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी के जैन यांनी पांड्या व राहुल यांना नोटीस बजावली आहे.

बीसीसीआयनं पांड्या व राहुल यांना तात्पुरते निलंबित केले होते. पण, लोकपाल यांच्याकडून निकाल येण्यापूर्वी ती बंदी उठवण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात बीसीसीआयनं पांड्या आणि राहुल यांची बाजू न एकल्यानं, हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना साक्ष देण्यासाठी मागील आठवड्यात नोटीस पाठवण्यात आल्याचे याबाबत न्यायाधीश जैन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, ''नियमानुसार मला त्यांचीही बाजू ऐकावी लागणार. आता साक्ष द्यायला कधी यायचे याचा निर्णय त्यांनी घ्यावा,'' असेही जैन यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान याआधी , हार्दिक आणि राहुल यांच्या बरोबर करण जोहरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोधपूरमधील सरेचा गावातील देवाराम मेघवाल यांनी महिलांसंदर्भात अश्लील विधान करणे, आयटी अॅक्ट आणि एससी-एसटी अ‍ॅक्ट या कलमानुसार लूनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पांड्याने महापुरुषांचा अपमान केल्याचे मेघवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट आणि वाद

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खेळाडूंशी निगडीत अनेक वाद झाले आहेत. मात्र हार्दिक पांड्या आणि केएल राहुलचं हे प्रकरण गेल्या ८२ वर्षांत फक्त दुसरं आहे, जेव्हा भारतीय खेळाडूंना दौऱ्याच्यामध्येच स्वदेशात पाठवलं आहे. १९३६ मध्ये लाला अमरनाथ यांना तत्कालीन कर्णधार विज्जी यांनी एका प्रथम श्रेणी सामन्या दरम्यान अपमानजनक वागणुकीमुळे त्यांना इंग्लंड दौऱ्यातून निलंबीत करत भारतात पाठवण्यात आलं होतं.

Loading...

परदेशी दौऱ्यात आतापर्यंत अनेकदा शिस्तीचा विषय उभा राहीला आहे. मात्र भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा बीसीसीआयने कारवाई केली आहे. तसेच दोषी खेळाडूंना स्वदेशात जायला सांगितले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने जुलै २००७ मध्ये प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, अमरनाथ हे राजकारणाचे बळी ठरले होते. पांड्या आणि राहुलचं प्रकरण हे पूर्णपणे वेगळं आहे. त्यांना महिलांविरुद्ध आक्षेपार्ह टिपणी केल्याची किंमत चुकवावी लागली.


rong>VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...