BCCIचा पांड्या-राहुलला दंड, शिक्षेची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना

BCCIचा पांड्या-राहुलला दंड, शिक्षेची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना

महिलांबद्दलच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयने पांड्या आणि केएल राहुलला 20 लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. त्यांनी दंडाची रक्कम भरली नाही तर....

  • Share this:

नवी दिल्ली, 20 एप्रिल : कॉफी विथ करण मध्ये महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बीसीसीआयने हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना दंड केला आहे. बीसीसीआयच्या लवादाने दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा दंड केला असून ही रक्कम कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या 10 कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये अशी देण्यास सांगितले आहे. तसेच दिव्यांग, दृष्टीदोष असलेल्या क्रिकेटपटूंच्या विकासासाठी फंडात 10 लाख रुपये जमा करण्याचे आदेश बीसीसीआयने दिले आहेत.

बीसीसीआयने सुनावलेल्या शिक्षेची रक्कम जर पांड्या आणि केएल राहुल यांनी जर वेळेत जमा केली नाही तर ती रक्कम आपण स्वत: भरू असे लवादाने म्हटले आहे. मात्र, दंडाची रक्कम केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्या सामन्याच्या मानधनातून नंतर कापून घेऊ असेही बीसीसीआयकडून स्पष्ट केले.

IPL 2019 : शतकासाठी स्वार्थी झाला विराट, संघापेक्षा शतक महत्त्वाचे?

हार्दिक पांड्या आणि केएल राहुलने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरून पांड्यावर टीकाही झाली होती. तेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पांड्याला मायदेशी पाठवण्यात आलं होतं. या प्रकरणी माफी मागत हार्दिक पांड्याने ट्वीट केलं होतं. तो म्हणाला होता की, माझ्या वक्तव्याने भावना दुखावल्या त्याबद्दल मी माफी मागतो.

रावसाहेब दानवे माझी मेहबूबा, खोतकरांच्या वक्तव्याने प्रचारसभेत हशा

First published: April 20, 2019, 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading