वडिलांचं अंतिम दर्शन न घेता सिराज पूर्ण करणार त्यांचं 'हे' स्वप्न, BCCIच्या परवानगीनंतरही भारतात येणार नाही

वडिलांचं अंतिम दर्शन न घेता सिराज पूर्ण करणार त्यांचं 'हे' स्वप्न, BCCIच्या परवानगीनंतरही भारतात येणार नाही

बीसीसीआयनं सिराजला भारतात परतण्याची परवानगी दिली आहे. मात्र सिराज भारतात परणार नसून ऑस्ट्रेलियातच राहून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : भारतीय संघाचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराजवर (Mohammed Siraj) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी सिराजच्या वडिलांचे निधन झाले. सिराज सध्या ऑस्ट्रेलियात असल्यामुळे वडिलांना त्याला निरोप देता आला नाही. दरम्यान, बीसीसीआयनं सिराजला भारतात परतण्याची परवानगी दिली आहे. मात्र सिराज भारतात परणार नसून ऑस्ट्रेलियातच राहून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

फुफ्फुसाच्या आजारामुळे मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद घाऊस यांचं शुक्रवारी निधन झालं, ते 53 वर्षांचे होते. सिराज हा टीम इंडियासोबत सध्या सिडनीमध्ये आहे. सराव करून आल्यानंतर सिराजला वडिल गेल्याचं सांगण्यात आल्याचं वृत्त स्पोर्ट्स स्टार या वेबसाईटने दिलं आहे. बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी शनिवारी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले. यात, BCCIनं सिराजसोबत संवाद साधला आहे. सिराजला पुन्हा भारतात परण्याचा पर्याय दिला होता, मात्र जलद गोलंदाजानं भारतीय संघासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयनं सिराजच्या या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, असे म्हणत कठिण समयी आम्ही त्याच्या सोबत आहोत, असे म्हटले आहे.

'देशासाठी मला खेळताना बघणं हे त्यांचं स्वप्न'

देशाचं नाव मोठं कर, असं माझे वडील नेहमी म्हणायचे, मी ते नक्कीच करीन, असं मोहम्मद सिराज स्पोर्ट्स स्टारशी बोलताना म्हणाला. देशासाठी मला खेळताना बघणं हे त्यांचं स्वप्न होतं. मी ते पूर्ण करून त्यांना आनंद दिला, अशी प्रतिक्रिया मोहम्मद सिराजने दिली. आयपीएलच्या या मोसमात मोहम्मद सिराजने उल्लेखनीय कामगिरी केली.

वडिलांनी रिक्षा चालवून शिकवलं

मोहम्मद सिराजचा क्रिकेटसाठीचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला. हैदराबादमधल्या गरिब कुटुंबामध्ये सिराजचा जन्म झाला. सिराजच्या वडिलांनी रिक्षा चालवून कुटुंब चालवलं. पण रिक्षाचालक असूनही त्यांनी सिराजला कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही. सिराजला क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांनी नेहमी आणून दिल्या. मोहम्मद सिराज दिवसभर क्रिकेटचा सराव करायचा, एवढच नाही तर कित्येक वेळा रात्रीही सराव केल्यामुळे सिराजला आईचा मारही खावा लागला.

Published by: Priyanka Gawde
First published: November 22, 2020, 10:31 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या