मुंबई, 29 सप्टेंबर : विंडीज दौऱ्यानंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची वर्णी लागली. तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने त्यांची निवड केली. आता या समितीलाच बीसीसीआय़ने हितसंबंधावरून नोटिस पाठवली असल्यानं रवी शास्त्रींची निवड धोक्यात आली आहे. बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी शनिवारी कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीला हितसंबंधांवरून नोटिस पाठवली आहे. या समितीमध्ये कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे. या समितीने नुकतीच भारताच्या मुख्य प्रशिक्षकांची निवड केली होती.
'आएएनएस'शी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, जर सीएसी सदस्य दोषी आढळले तर रवी शास्त्रींच्या नियुक्तीवर फेरविचार केला जाऊ शकतो. त्यामुले पुन्हा एकदा निवड प्रक्रियेला सामोर जावं लागण्याची शक्यता आहे. बीसीसीआयसाठी ही गोष्ट गंभीर असेल.
बीसीसीआयच्या संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप सीएसीच्या सदस्यांवर करण्यात आला आहे. तिघांनाही नोटिसीला उत्तर देण्यासाठी 10 ऑक्टोंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. याआधी बीसीसीआयने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनाही अशा प्रकारची नोटिस पाठवली होती. आता मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनी सीएसीमधील सदस्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रवि शास्त्रींची निवड या समितीने केली होती. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीएसीच्या सदस्यांना तक्रारीचे उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.
बीसीसीआयच्या नियमांनुसार सीएसीच्या सदस्यांना क्रिकेटमध्ये इतर कोणतीही भूमिका बजावता येत नाही. गुप्ता यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, सीएसीचे सदस्य एकाचवेळी अनेक कामं करत आहेत. कपिल देव सीएसीशिवाय समालोचक, एका कंपनीचे मालक आणि भारतीय क्रिकेटर्स संघाचे सदस्य आहेत. तर गायकवाड हे एका अकादमीचे मालक असून बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त समितीचे सदस्य आहेत.
भारताच्या माजी महिला कर्णधार रंगास्वामी यांनी सीएसीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.तसेच 'आयसीए'च्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. सीएसीने डिसेंबरमध्ये महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकांची निवड केली होती.
खेळता खेळता चिमुकला व्हॅनखाली चिरडला; अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kapil dev, Team india