BCCIचं अफगाणला मोठं गिफ्ट, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार!

BCCIचं अफगाणला मोठं गिफ्ट, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार!

देहरादूनमध्ये पंचतारांकित हॉटेल नसल्यामुळं त्यांनी लखनऊमध्ये मैदान देण्याची मागणी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने बीसीसीआयकडे केली होती.

  • Share this:

लखनऊ, 23 जुलै : भारतीय क्रिकेट बोर्डनं लखनऊमध्ये तयार करण्यात आलेले इकाना हे मैदान अफगाणिस्तान संघाचे घरचे मैदान बनवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आणि देहरादूनमध्ये अफगाणिस्तानचे खेळाडू सरावासाठी येतात. मात्र देहरादूनमध्ये पंचतारांकित हॉटेल नसल्यामुळं त्यांनी लखनऊमध्ये मैदान देण्याची मागणी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने बीसीसीआयकडे केली होती.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं पंचतारांकित हॉटेल नसल्यामुळं त्यांनी दुसरीकडे घरेलु मैदान देण्याची मागणी केली होती. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या संघ दुसऱ्या देशात घरेलु मैदान असणार आहे. याआधी भारताचा नावाजलेला ब्रॅण्ड असलेला अमूल हा अफगाणिस्तानचा वर्ल्ड कपमधला स्पॉन्सर आहे. भारतानं नेहमीच अफगाणिस्तान क्रिकेटला मदत केली आहे.

आयसीसीनंही दिली मान्यता

बीसीसीआयनं ही घोषणा केल्यानंतर आयसीसीनं या मैदानावर अफगाणिस्तानचे सामने आयोजित करण्याच्या मागणीवर मान्यता दिली आहे. त्यामुळं या मैदानावर आता दोन टी-20, तीन एकदिवसीय, एक कसोटी सामने आयोजिक केले जाऊ शकतात. याच मैदानावर अफगाणिस्तानचा संघ नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिज विरोधात लखनऊच्या मैदानावर खेळणार आहे.

वाचा-IND vs WI : निवड समितीच्या निर्णयावर नाराज झाला टीम इंडियाचा स्टार खेळाडू

भारतीय संघही खेळणार याच मैदानावर

इकाना मैदानाला अफगाणिस्तानचे घरचे मैदान तयार करण्यात आले असले तरी, भारतीय संघही या मैदानावर खेळणार आहे. 2020मध्ये दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे त्यावेळी याच मैदानावर एकदिवसीय सामने होतील.

वाचा- अश्विननं 'मिस्ट्री बॉल'वर घेतली विकेट, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

वाचा- कोहलीनंतर आता 'हा' पुणेकर टीम इंडियाचं नवं रन मशिन!

VIDEO: गायिका वैशाली माडे 'या' कारणामुळे पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 04:58 PM IST

ताज्या बातम्या