News18 Lokmat

वर्ल्डकपनंतर शास्त्रींच्या जागी नवा प्रशिक्षक?

वर्ल्डकपनंंतर विराटसेनेला मिळणार नवा प्रशिक्षक?

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 03:19 PM IST

वर्ल्डकपनंतर शास्त्रींच्या जागी नवा प्रशिक्षक?

नवी दिल्ली, 20 मार्च : भारतीय संघ वर्ल्डकपची तयारी सुरू असताना प्रशिक्षक रवि शास्त्रींची मुदत वाढणार का नाही यावर चर्चा सुरू झाली आहे. रवि शास्त्रींची जुलै 2017 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. वर्ल्डकपनंतर त्यांचा करार संपणार आहे. याबाबत क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय लवकरच यासाठी जाहिरात देण्याची शक्यता आहे.

वर्ल्डकपनंतर रवि शास्त्रींसोबतचा करार संपणार असून त्यांच्या जाही नवीन प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र, शास्त्रींना वर्ल्डकपनंतर होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या भारतीय संघाचे चार प्रशिक्षक आहेत. संजय बांगर, भरत अरुण, एस. श्रीधर आणि रवि शास्त्री हे देखील प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. यांच्या पैकी कोणालाही प्रशिक्षकपदासाठी अर्ज करावा लागणार नाही.

रवि शास्त्री आणि भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांच्यात प्रशिक्षक पदावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील मतभेदामुळे रवि शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाली. यासाठी 5 लोकांची नावे निवडण्यात आली होती.

रवि शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत भारताने कसोटी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय साजरा केला.

Loading...


वाचा : धोनीला मागे टाकून विराटने पटकावला सातवा नंबर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 03:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...