• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : आयपीएलचं मेगा ऑक्शन, मुंबई इंडियन्सची चिंता वाढणार!

IPL 2021 : आयपीएलचं मेगा ऑक्शन, मुंबई इंडियन्सची चिंता वाढणार!

आयपीएल (IPL) बीसीसीआयला (BCCI) सर्वाधिक महसूल मिळवून देते, त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड पुढच्या वर्षी खेळाडूंचा मेगा ऑक्शन (IPL Auction) घेणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 जून: आयपीएल (IPL) बीसीसीआयला (BCCI) सर्वाधिक महसूल मिळवून देते, त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड पुढच्या वर्षी खेळाडूंचा मेगा ऑक्शन (IPL Auction) घेणार आहे. या लिलावामध्ये सगळ्या फ्रॅन्चायजींना काही खेळाडूंना रिटेन करता येईल, पण बहुतेक खेळाडू लिलावामध्ये जातील. एवढच नाही तर पुढच्या वर्षी आयपीएलच्या दोन टीम वाढणार आहेत. बीसीसीआय लवकरच नव्या टीमसाठीचं टेंडर काढणार आहे. नियमानुसार सगळ्या टीमना जास्तीत जास्त 3 खेळाडूंना रिटेन करता येईल. याशिवाय दोन खेळाडूंना आरटीएम म्हणजेच राईट टू मॅच कार्ड वापरून लिलावात पुन्हा एकदा टीममध्ये घेता येईल. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईसाठी (Mumbai Indians) मात्र हे अडचणीचं ठरू शकतं, कारण त्यांची संपूर्ण टीम संतुलित आहे. मुंबईच्या टीममध्ये रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, पांड्या बंधू, पोलार्ड, बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत, पण या 8 जणांपैकी फक्त 5 जणांनाच टीममध्ये कायम ठेवता येणार आहे. त्यामुळे मुंबईला खेळाडूंना विकत घेण्यासाठी नव्याने रणनिती आखायला लागेल. आयपीएल लिलावामध्य चेन्नई सुपरकिंग्सला (CSK) एमएस धोनीच्या (MS Dhoni) भवितव्याबाबतही निर्णय घ्यावा लागेल, कारण धोनीचं वय बघता आता तो किती काळ क्रिकेट खेळेल, याबाबत साशंकता आहे. आरसीबीची (RCB) टीम कर्णधार म्हणून विराट कोहलीला (Virat Kohli) कायम ठेवू शकते. मॅचची संख्या वाढणार पुढच्या मोसमात 8 ऐवजी 10 टीम खेळणार असतील तर मॅचची संख्याही वाढेल. दोन टीम वाढल्यानंतर स्पर्धेचा फॉरमॅट कसा असेल, याबाबत बीसीसीआयने अजून कोणतीही घोषणा केली नाही, पण मागच्यावेळी जेव्हा आयपीएलमध्ये 10 टीम होत्या तेव्हा त्यांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं होतं. 10 टीमना घेऊन स्पर्धा खेळवायची असेल तर 76 ते 94 मॅच होतील, मग बीसीसीआयला जास्त कालावधीची गरज पडेल आणि खेळाडूंवरचा ताणही वाढेल. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कपही होणार आहे. यंदाचा मोसम युएईमध्ये आयपीएल 2021 च्या उरलेल्या मॅच 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार असल्याचं वृत्त आहे, पण याच्या वेळापत्रकाची अजून घोषणा झालेली नाही. कोरोना व्हायरसमुळे यंदाची स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती. तोपर्यंत 29 मॅच झाल्या होत्या. आता उरलेल्या 31 मॅच युएईमध्ये होणार आहेत. यानंतर लगेचच युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन होईल.
  Published by:Shreyas
  First published: