मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

भारतीय खेळाडू परदेशातल्या T20 लीगमध्येही धमाका करणार! असा आहे BCCI चा प्लान

भारतीय खेळाडू परदेशातल्या T20 लीगमध्येही धमाका करणार! असा आहे BCCI चा प्लान

बीसीसीआय (BCCI) येत्या काही काळात भारतीय क्रिकेटपटूंना (Indian Cricketer) परदेशातल्या टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी देऊ शकतं. बोर्ड आता याबाबत भारतीय खेळाडूंना दिलासा द्यायच्या विचारात आहे.

    मुंबई, 23 जुलै : बीसीसीआय (BCCI) येत्या काही काळात भारतीय क्रिकेटपटूंना (Indian Cricketer) परदेशातल्या टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी देऊ शकतं. बोर्ड आता याबाबत भारतीय खेळाडूंना दिलासा द्यायच्या विचारात आहे. परदेशामध्ये आयपीएलच्या वाढत्या प्रभावासोबतच भारतीय खेळाडूंना तिथल्या लीगमध्येही खेळून द्यायची मागणी वाढू लागली आहे. नुकत्याच 6 आयपीएल फ्रॅन्चायजींनी दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमधल्या टीम विकत घेतल्या. आता आयपीएल फ्रॅन्चायजींच्या दबावामुळे बीसीसीआय परदेशी लीगमध्ये भारतीय खेळाडूंना मंजुरी देण्याबाबत विचार करू शकतं. भारतीय खेळाडूंना परदेशात होणाऱ्या टी-20 लीगसाठी परवानगी देण्याबाबतचा अंतिम निर्णय सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या बीसीसीआयच्या एजीएमध्ये घेतला जाऊ शकतो. इनसाईड स्पोर्ट्सच्या एका वृत्तात याबाबत माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या काही टीमनी भारतीय खेळाडूंना परदेशातही टी-20 लीग खेळून द्यावी, अशी मागणी केल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी आम्हाला बैठकीमध्ये चर्चा करावी लागेल. हा वादग्रस्त मुद्दा आहे, कारण आयपीएल त्याच्या वैशिष्ट्यामुळे यशस्वी आहे. फ्रॅन्चायजी लीगच्या वाढत्या संख्येमुळे भारतीय खेळाडूंची मागणी केली जात आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली. सध्या फक्त भारतीय महिला क्रिकेटपटूच परदेशी लीगमध्ये खेळतात. याशिवाय संन्यास घेतल्यानंतर काही क्रिकेटपटूही जगभरातल्या वेगवेगळ्या लीग क्रिकेटमध्ये सहभागी होतात. बीसीसीआयने भारतीय पुरूष खेळाडूंना परदेशात टी-20 लीग खेळण्याची परवानगी दिलेली नाही. भारतीय खेळाडू परदेशातल्या लीग खेळले तर आयपीएलच्या स्वत:च्या ओळखीला धक्का लागेल, अशी भीती बीसीसीआयला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Ipl

    पुढील बातम्या