क्रिकेटपटूंसाठी BCCIने उचललं कठोर पाऊल, खोटं बोलून करू शकत नाही ‘हे’ काम

क्रिकेटपटूंसाठी BCCIने उचललं कठोर पाऊल, खोटं बोलून करू शकत नाही ‘हे’ काम

क्रिकेटमध्ये फसवणूक करणाऱ्यांविरोधात बीसीसीआयनं कठोर पाऊल उचललं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : क्रिकेटमध्ये वय लपवणे, काही नवीन नाही. प्रत्येक देशात असंख्य युवा खेळाडू आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले खर लपवतात. नुकतेच बीसीसीआयनं मुंबई इंडियन्स आणि जम्मू-काश्मीरचा जलद गोलंदाज रासिक सलामवर याच कारणामुळं एक वर्षांची बंदी लावली. याचबरोबर मनजोत कालरा आणि नितीश राणा या खेळाडूंवरही असे आरोप करण्यात आले आहेत. मात्र आता बीसीसीआयनं एक मोठा निर्णय घेतला आहे.

स्थानिक पातळीवर अनेक खेळाडू आपलं वय लपवून क्रिकेट खेळतात. त्यांच्यावर लगाम बसावा यासाठी बीसीसीआयनं खेळाडूंसाठी प्रत्येक वयोगटासाठी स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र तरी सुध्दा असे प्रकार थांबले नाही, त्यामुळं हे रोखण्यासाठी बीसीसीआयनं कठोर पाऊले उचलली आहे.

बीसीसीआयनं सुरू केली हेल्पलाईन

वयाच्या संबंधी फसवणूक रोखण्यासाठी बीसीसीआयनं मोठं पाऊल उचललं आहे. बीसीसीआयनं आपल्या डोपिंग रोधी हेल्पलाईननंतर आता वयासंबंधी फसवणुकीसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यामुळं आता सर्व स्थानिक संघ किंवा स्टाफ डोपिंग, भ्रष्टाचार आणि वयाची फसवणुकीबाबत या हेल्पलाईनची मदत घेऊ शकतात. सध्या हे क्रमांक सर्व स्थानिक क्रिकेटमध्ये वापरण्यात येणार आहेत. तसेच, तक्रारदारांची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहे. तर, खेळाडूंवर वेळच्या वेळी कारवाई करण्यात येणार आहे.

वाचा-सलामीच्या 'टेस्ट'मध्ये रोहित शर्मा पास! दिग्गजांना टाकले मागे

राहुल द्रविडनं व्यक्त केली होती नाराजी

द्रविडच्या मते, “या फसवणुकीमुळे प्रतिभाशाली खेळाडूंना संधी मिळत नाही. मला माहीत आहे की, कार्यालयीन क्रिकेटमध्ये वयाचा मुद्दा नसतो. तरीदेखील मी सांगतो की, वयचोरीला थारा देऊ नका. त्याचे समर्थन करू नका. असे खेळाडू वयोगटात चमकतात; पण सीनियरमध्ये शून्य ठरतात. हे भयाण आहे. हे रोखूया. असे वयचोर खेळाडू स्वतःचेच नव्हे तर क्रिकेटचेही नुकसान करतात’, असे ठणकावून सांगितले. राहुल द्रविडच्या मते, “वयाबाबत केलेल्या फसवणुकीमुळं हा प्रकार ज्युनिअर खेळाडूंवर वाईट परिणाम करतो. खेळाडूंकडे प्रतिभा असली तर त्यांना संघात संधी मिळत नाही. भारतीय खेळाडूंवर असे आरोप अनेकदा झाले आहेत. पण ही गोष्ट क्रिकेटसाठी चांगली नाही”, असे सांगितले.

वाचा-सलामीच्या 'टेस्ट'मध्ये रोहित शर्मा पास! दिग्गजांना टाकले मागे

VIDEO : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा, उमेदवारीसाठी थेट रास्ता रोको

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2019 05:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading