• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Team India चा कोच होण्यासाठी पूर्ण कराव्या लागणार या अटी, BCCI ने दिली जाहिरात

Team India चा कोच होण्यासाठी पूर्ण कराव्या लागणार या अटी, BCCI ने दिली जाहिरात

टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ (Team India Coach) बदलणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ (Team India Coach) बदलणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. वर्ल्ड कपनंतर आपल्याला पुन्हा कोच व्हायची इच्छा नसल्याचं रवी शास्त्री यांनी सांगितलं आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या नव्या कोचसाठी बीसीसीआयने (BCCI) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मुख्य प्रशिक्षकांसह बॅटिंग कोच, बॉलिंग कोच आणि फिल्डिंग कोच या पदासाठीही अर्ज मागवण्यात आले आहेत. भरत अरुण (Bharat Arun) सध्या टीमचे बॉलिंग कोच तर आर.श्रीधर (R Sridhar) फिल्डिंग कोच आहेत, त्यांचा कार्यकाळही वर्ल्ड कपनंतर संपतो आहे. तर विक्रम राठोड (Vikram Rathore) यांना बॅटिंग कोच म्हणून कायम ठेवलं जाईल, असं बोललं जात होतं, पण बीसीसीआयच्या जाहिरातीमुळे आता बॅटिंग कोचही बदलणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. टीम इंडियाचा कोच होण्यासाठी बीसीसीआयने काही नियम ठेवले आहेत. यामध्ये या पदासाठी किती अनुभव असला पाहिजे, यासाठीच्या अटी आहेत. राहुल द्रविड याने टीम इंडियाचा कोच व्हायला होकार दिला असल्याचं वृत्तही प्रसिद्ध झालं आहे. मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी अटी - इच्छुक व्यक्ती कमीत कमी 30 टेस्ट किंवा 50 वनडे खेळलेला असावा. किंवा टेस्ट खेळणाऱ्या देशाचा कमीत कमी दोन वर्ष मुख्य प्रशिक्षक असला पाहिजे. किंवा -क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा/आयपीएल टीम किंवा आंतरराष्ट्रीय लीग/प्रथम श्रेणी क्रिकेट/राष्ट्रीय ए टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून 3 वर्षांचा अनुभव असावा. किंवा - बीसीसीआयचा लेव्हल 3 किंवा त्यासारखा कोचिंगचा कोर्स केलेली व्यक्ती अर्ज करू शकते. - अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असावं. बॅटिंग कोचसाठीच्या अटी - कमीत कमी 10 टेस्ट किंवा 25 वनडे खेळलेला खेळाडू किंवा - कमीत कमी 2 वर्षांसाठी टेस्ट खेळणाऱ्या देशाचा बॅटिंग कोच किंवा - क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा/ आयपीएल टीम किंवा आंतरराष्ट्रीय लीगचा/ नॅशनल ए टीम/ प्रथम श्रेणी टीम/ अंडर-19 नॅशनल टीमसाठी कमीत कमी 3 वर्ष बॅटिंग कोच राहिलेली व्यक्ती किंवा - बीसीसीआयचा लेव्हल 3 किंवा त्यासारखा कोचिंगचा कोर्स केलेली व्यक्ती अर्ज करू शकते. - अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असावं. बॉलिंग कोचसाठीच्या अटी - कमीत कमी 10 टेस्ट किंवा 25 वनडे खेळलेला खेळाडू किंवा - कमीत कमी 2 वर्षांसाठी टेस्ट खेळणाऱ्या देशाचा बॉलिंग कोच किंवा - क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा/ आयपीएल टीम किंवा आंतरराष्ट्रीय लीगचा/ नॅशनल ए टीम/ प्रथम श्रेणी टीम/ अंडर-19 नॅशनल टीमसाठी कमीत कमी 3 वर्ष बॉलिंग कोच राहिलेली व्यक्ती - अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असावं. फिल्डिंग कोचसाठीच्या अटी - कमीत कमी 10 टेस्ट किंवा 25 वनडे खेळलेला खेळाडू किंवा - कमीत कमी 2 वर्ष टेस्ट खेळणाऱ्या देशाचा फिल्डिंग कोच किंवा - क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा/ आयपीएल टीम किंवा आंतरराष्ट्रीय लीगचा/ नॅशनल ए टीम/ प्रथम श्रेणी टीम/ अंडर-19 नॅशनल टीमसाठी कमीत कमी 3 वर्ष फिल्डिंग कोच राहिलेली व्यक्ती - अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असावं.
  Published by:Shreyas
  First published: