मुख्य कोचसाठी BCCIने मागवले अर्ज; रवी शास्त्री जाणार की राहणार?

मुख्य कोचसाठी BCCIने मागवले अर्ज; रवी शास्त्री जाणार की राहणार?

काही वर्षांपासून शास्त्री प्रशिक्षक असूनही भारतीय संघानं एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला मानहानीकारक पराभव मिळाल्यानंतर बीसीसीआयनं संघात बदल करण्यास सुरुवात केली आहे. बीसीसीआयनं आज मुख्य प्रशिक्षक आण इतर सपोर्टिंग स्टाफसाठी अर्ज मागवले आहे. त्यामुळं लवकरच रवी शास्त्रींना सोडचिट्टी मिळू शकते. बीसीसीआयनं मागितलेल्या अर्जात मुख्य कोच पुरुष संघ, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओ, स्ट्रेंथ आणि कंडिशन प्रशिक्षक यांची मागणी केली होती.

30 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची विनंती

बीसीसीआयनं इच्छूक असणाऱ्यांना आपले अर्ज 30 जुलै 2019 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भरू शकतात, असे सांगितले आहे. वर्ल्ड कपमधून भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरत आहे. काही वर्षांपासून शास्त्री प्रशिक्षक असूनही भारतीय संघानं एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. त्याच्या कोचिंगमध्ये भारतीय संघ निराशाजनक कामगिरी करत होता, त्यामुळं बीसीसीआयनं हा निर्णय घेतला असावा.

वेस्ट इंडिज दौरा शास्त्रींचा शेवटचा दौरा?

भारतीय संघाचा प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या 3 ऑगस्टपासून सुरु होणारा वेस्ट इंडिज दौरा हा शेवटचा दौरा असू शकतो. वर्ल्ड कपनंतर शास्त्रींचा करार संपुष्टात आला होता. मात्र बीसीसीच्या वतीनं हा करार 45 दिवसांनी वाढवला.

भारतानं गमावल्या मोठ्या स्पर्धा

शास्त्री गेली 2 वर्षे भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत. या काळात भारतीय संघानं कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक मिळवला होता. मात्र भारताला एकही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्येच भारताला पराभव स्विकारावा लागला. तर, गेल्या दोन वर्षात भारतनं इंग्लंड विरोधात पराभव स्विकारावा लागला. त्यामुळं शास्त्री गुरुजी सध्या भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहेत.

शास्त्री भारतासाठी अनलकी

ऑगस्ट 2014मध्ये भारतीय संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली होती. आपल्या कार्यकाळात 2015मध्ये भारत सेमीफायनलमधून बाहेर पडला होता. याशिवाय 2016मध्ये वर्ल्ड टी-20मध्ये भारत सेमीफायनलमध्ये पोहचला होता. मात्र भारताला चॅम्पियन बनता आले नाही.

इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO

Tags:
First Published: Jul 16, 2019 02:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading