वर्ल्ड कपदरम्यान पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत राहा पण...BCCIनं टाकला बाउन्सर

वर्ल्ड कपदरम्यान पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत राहा पण...BCCIनं टाकला बाउन्सर

30 मे पासून विश्वचषकाला सुरुवात होत असून एकूण 47 दिवस ही स्पर्धा खेळली जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : एकीकडं आयपीएलचा बारावा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यानंतर सर्व खेळाडू विश्वचषकाच्या तयारीला लागतील. वर्ल्ड कप स्पर्धा 30 मे ते 15 जुलै या कालावधीमध्ये होणार आहे. त्याकरिता भारतीय संघ 21मे रोजी इंग्लंडला रवाना होऊ शकतो. दरम्यान बीसीसीआयनं याआधी खेळाडूंना पत्नी किंवा प्रेयसी यांच्यासोबत राहण्याची परवानगी नव्हती. मात्र आता, बीसीसीआयनं खेळाडूंना पत्नी किंवा प्रेयसी यांच्यासोबत राहण्याची मूभा दिली आहे. मात्र यात त्यांनी एक अट घातली आहे.

30 मे पासून विश्वचषकाला सुरुवात होत असून एकूण 47 दिवस ही स्पर्धा खेळली जाणार आहे. दरम्यान बीसीसीआयनं खेळाडूंना पत्नी किंवा प्रेयसी यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली असली तरी, ते केवळ 15 दिवस त्यांच्यासोबत राहू शकतात. तसेच, पहिल्या 21 दिवसांमध्ये कोणताही खेळाडू आपल्या पत्नी किंवा प्रेयसीसोबत राहू शकत नाही.

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ 21 मे रोजी इंग्लंडला रवाना होऊ शकतो. दरम्यान या कालावधीमध्ये खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाबरोबर राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विराट कोहलीनं बीसीसीआयकडे केली होती. मात्र बोर्डानं विराटशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता या स्पर्धेदरम्यान कुटुंबातील व्यक्तींना सोबत ठेवण्यासंदर्भातील नियम जाहीर केले आहेत. या नवीन नियमांमुळे स्पर्धेच्या सुरुवातील क्रिकेटपटूंच्या जोडीदारांना त्यांच्या सोबत राहता येणार नाही. मागील काही परदेश दौऱ्यांमध्ये खेळाडूंच्या कुटुंबियांची सोय करण्यामध्ये बीसीसीआयला अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळं हे नियम बनवण्यात आले होते.

वर्ल्ड कपकरिता बीसीसीआयनं बनवलेल्या नियमांनुसार 16 जून रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्येही भारतीय खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासोबत नसतील. दरम्यान भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 जून रोजी होणार आहे. यावेळी विश्वचषकामध्ये 10 संघाचा सहभाग असणार असून ही स्पर्धा 47 दिवस सुरु राहणार आहे.

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

वाचा- CSK vs DC : रिषभ पंतला रोखण्यासाठी ‘हा’ आहे धोनीचा मास्टरप्लॅन

सॅम पित्रोदांच्या विधानावरून वाक् युद्ध, पंतप्रधान मोदी म्हणाले VIDEO

First published: May 10, 2019, 3:17 PM IST

ताज्या बातम्या