Home /News /sport /

BCCI Pension Scheme : भारताच्या माजी क्रिकेटपटूंना किती पेन्शन मिळते? असे आहेत स्लॅब

BCCI Pension Scheme : भारताच्या माजी क्रिकेटपटूंना किती पेन्शन मिळते? असे आहेत स्लॅब

बीसीसीआयने सोमवारी माजी क्रिकेटपटू आणि अंपायरच्या पेन्शनमध्ये (BCCI Pension Scheme) वाढ करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या या निर्णयाचं माजी क्रिकेटपटूंनी स्वागत केलं. मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि अमित मिश्रा (Amit Mishra) या क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पेन्शन वाढवल्याबद्दल बीसीसीआयला धन्यवाद दिले.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 जून : बीसीसीआयने सोमवारी माजी क्रिकेटपटू आणि अंपायरच्या पेन्शनमध्ये (BCCI Pension Scheme) वाढ करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या या निर्णयाचं माजी क्रिकेटपटूंनी स्वागत केलं. मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) आणि अमित मिश्रा (Amit Mishra) या क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पेन्शन वाढवल्याबद्दल बीसीसीआयला धन्यवाद दिले. 'माझे वडील 60 प्रथम श्रेणी मॅच खेळले आहेत आणि त्यांनी 3 हजार रन केले, 5 शतकंही केली. पैसे नव्हता तरीही त्यांच्या पिढीने या खेळाला पुढे घेऊन जाण्यात मदत केली. त्यांच्या या योगदानाची आठवण बीसीसीआयने ठेवली आणि मोठं मन दाखवलं. थँक्स बीसीसीआय, हे सेवानिवृत्त खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचं आहे. माझे वडील मोहम्मद तारिफ पेन्शन मिळाल्यानंतर कायमच खूश होतात. पैसे सुरक्षा देतात, ओळख तुम्हाला गौरव मिळवून देते,' असं ट्वीट कैफने केलं. दुसरीकडे अमित मिश्रा यानेही बीसीसीआयच्या या निर्णयाचं कौतुक केलं. लवकरच परदेशातले क्रिकेट बोर्डही लवकरच या निर्णयाला लागू करतील, असं अमित मिश्रा म्हणाला आहे. असे आहेत बीसीसीआयचे पेन्शन स्लॅब 2003 आधी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झालेले क्रिकेटपटू, ज्यांनी 50-74 मॅच खेळल्या, त्यांना आधी 15 हजार रुपये पेन्शन मिळायची, पण आता त्यांना 30 हजार रुपये मिळतील. 75 पेक्षा जास्त प्रथम श्रेणी मॅच खेळलेले आणि 2003 आधी निवृत्ती घेतलेले जे क्रिकेटपटू आहेत, त्यांची पेन्शन 22,500 रुपये असलेली पेन्शन 45 हजार होणार आहे. 31 डिसेंबर 1993 च्या आधी निवृत्त झालेल्या आणि 25 पेक्षा जास्त टेस्ट खेळलेल्या सगळ्या टेस्ट क्रिकेटपटूंना 50 हजार रुपये पेन्शन मिळत होती, आता नव्या योजनेमुळे याच खेळाडूंना 70 हजार रुपये मिळतील. 25 पेक्षा कमी टेस्ट खेळलेल्यांना 37,500 रुपये मिळायचे, त्यांच्या खात्यात आता 60 हजार रुपये जमा होतील. 5-9 टेस्ट खेळलेल्या महिला क्रिकेटपटूंची पेन्शन 15 हजारवरून 30 हजार करण्यात आली आहे. 10 पेक्षा जास्त टेस्ट खेळलेल्या महिला क्रिकेटपटूंना 22,500 ऐवजी 45 हजार रुपये मिळतील.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Team india

    पुढील बातम्या