मोठी बातमी! ... तर T20 वर्ल्ड कप 'या' देशात होणार, BCCI ची घोषणा

मोठी बातमी! ... तर T20 वर्ल्ड कप 'या' देशात होणार, BCCI ची घोषणा

देशातील कोरोना व्हायरस महामारी नियंत्रणात आली नाही तर यावर्षी होणारा टी20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2021) भारतामध्ये होणार नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं पहिल्यांदाच या विषयावर ही मोठी माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल: देशातील कोरोना व्हायरस महामारी नियंत्रणात आली नाही तर यावर्षी होणारा टी20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2021) भारतामध्ये होणार नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं पहिल्यांदाच या विषयावर ही मोठी माहिती दिली आहे. यावर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. मात्र, देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हा वर्ल्ड कप भारतामध्ये होण्याची शक्यता कमी आहे. या परिस्थितीमध्ये संयुक्त अरब अमिरात (UAE) या देशात ही स्पर्धा होईल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय.

बीसीसीआयचे जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. " बीसीसीआयनं वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाची आशा अद्याप सोडलेली नाही. माझी या स्पर्धेच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ही स्पर्धा देशातच व्हावी हा माझा प्रयत्न आहे. मात्र, आम्हाला सामान्य आणि खराब या दोन्ही परिस्थितीचा विचार करावा लागेल. याच आधारावर आम्ही आयसीसी (ICC) सोबत चर्चा करणार आहोत.

कोरोनामुळे क्रिकेट सीरिजला ब्रेक; मुंबई टी-20 लीग स्थगित

या स्पर्धेचे पर्यायी ठिकाण म्हणून यूएईचा विचार करुन आम्ही तयारी करत आहोत. या विषयावर अंतिम निर्णय बीसीसीआय घेईल," असं मल्होत्रा यांनी सांगितले. यापूर्वी देशातील कोरोना व्हायरसमुळे मागच्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेचं आयोजन बीसीसीआयनं युएईमध्ये केलं होतं.

बीसीसीआयनं मागच्या वर्षी अमिरात क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्यासोबत एक करार केला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवण्यास ECB ला अडचण येणार नाही. याबाबत अमिरात क्रिकेट बोर्डानं अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आयपीएलमधून चार खेळाडूंची माघार

देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चार खेळाडूंनी मागील आठवड्यात आयपीएलमधून माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अँड्र्यू टाय, केन रिचर्डसन आणि एडम झम्पा ही स्पर्धा अर्धवट सोडून मायदेशी परतले आहेत. तर भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विनने घरातील व्यक्तीला कोरोना झाल्यानं आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे.

Published by: News18 Desk
First published: April 30, 2021, 5:20 PM IST

ताज्या बातम्या