अखेर BCCI झुकलं! नाडाच्या रडारावर येणार क्रिकेटपटू

अखेर BCCI झुकलं! नाडाच्या रडारावर येणार क्रिकेटपटू

पृथ्वी शॉ प्रकरणामुळं BCCIला दणका, खेळाडूंना रहावे लागणार सावधान!

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानं त्याच्यावर 8 महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पृथ्वीला नोव्हेंबरपर्यंत खेळता येणार नाही. दरम्यान पृथ्वीवर बंदीची कारवाई होण्याआधी सरकारने बीसीसीआय़ला फटकारले होते. डोपिंग टेस्टच्या प्रक्रियेवरून सरकारने बीसीसीआयला खडेबोल सुनावत पत्र लिहलं होतं. यात उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीमध्ये असलेल्या त्रुटींबद्दल उल्लेख करण्यात आला होता.

दरम्यान, खेळ मंत्रालयाचे सचिव राधेश्याम जुलानिया यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्या केलेल्या बैठकीनंतर नाडा संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला. जोहरी यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत, बीसीसीआय आता नाडा (उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी)च्या नियमांमध्ये येणार हे. त्यामुळं आता यापुढे या चाचणीअंतर्गत खेळाडूंची डोपिंग तपासणी होणार आहे. याआधी बीसीसीआयकडे नाडाच्या नियमानुसार अँटी डोपिंगचा अधिकार नव्हता. आता मात्र, अखेर हा नियम लागू करावा लागला. यामुळं खेळाडूंच्या अडचणी वाढणार आहेत.

वाचा-काश्मीरमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे रोखण्यासाठी धोनी करणार महत्त्वाचं काम!

वाचा-युवराजसह निवृत्ती घेतलेले ‘हे’ भारतीय खेळाडू दुसऱ्या देशात खेळणार क्रिकेट!

बीसीसीआयनं अखेर घेतली माघार

क्रिडा मंत्रालयानं ताकीद देऊनही बीसीसीआयनं नाडामध्ये येण्यास नकार दिला होता. बीसीसीआयला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीशी जोड़ण्यावरून गेल्या काही वर्षांपासून सरकारसोबत वाद सुरू आहे. देशातील इतर खेळातील खेळाडू नाडा अंतर्गत येतात मात्र बीसीसीआय़ यामध्ये येत नाही. याबाबात बीसीसीआयने म्हटलं होतं की, नाडाच्या प्रक्रियेत अनेक कमतरता आहेत. दरम्यान क्रीडा मंत्रालयानं त्यांच्या पत्रात बीसीसीआयच्या दाव्याला फेटाळून लावलं आहे. दक्षिण आफ्रिका ए आणि महिला संघाच्या सामन्यादरम्यान बीसीसीआयनं ही चाचणी घेण्यास नकार दिला होता. मात्र आता नाडाच्या रडारवर आल्यामुळं खेळाडूंना सावध रहावे लागणार आहे.

वाचा-INDvsWI 1st ODI : विराटला जाणवली धोनीची उणीव, पंत पडला कमी!

माय लेकराला भांड्यात बसवून तरुणांनी वाचवलं, पाहा हा VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: August 9, 2019, 3:15 PM IST
Tags: team india

ताज्या बातम्या