संघात नसलेला खेळाडूने झळकावले अर्धशतक; BCCI केली मोठी चूक!

संघात नसलेला खेळाडूने झळकावले अर्धशतक; BCCI केली मोठी चूक!

पृथ्वीच्या पुनरागमनापेक्षा बीसीसीआय(BCCI)च्या चूकीची अधिक चर्चा झाली.

  • Share this:

मुंबई, 17 नोव्हेंबर: उत्तेजक द्रव्यांचे सेवन (डोपिंग) केल्याप्रकरणी बंदीची शिक्षा भोगल्यानंतर पृथ्वी शॉ(Prithvi Shaw)ने सय्यद मुश्ताक अली टी-20 (Syed Mushtaq Trophy)स्पर्धेत धमाकेदार पुनरागमन केले आहे. आसाम(Assam)विरुद्ध खेळताना मुंबई(Mumbai)कर पृथ्वीने 39 चेंडूत 63 धावांची खेळी केली. यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अर्थात पृथ्वीच्या या शानदार कमबॅकवर बीसीसीआयने मात्र मोठी चूक केली. त्यामुळे पृथ्वीच्या पुनरागमनापेक्षा बीसीसीआय(BCCI)च्या चूकीची अधिक चर्चा झाली.

आसाम आणि मुंबई यांच्यात झालेल्या या सामन्यात बीसीसीआयने त्यांच्या वेबसाईटवरील स्कोअर बोर्डमध्ये मोठी चूक केली. स्कोअर बोर्डमध्ये बीसीसीआयने सलामीवीर पृथ्वी शॉच्या ऐवजी अखिल हरवाडकर याचे नाव लिहले. इतक नव्हे तर त्यापुढील धावसंख्या देखील चुकीची लिहली. शॉने 39 चेंडूत 63 धावा केल्या होत्या. पण वेबसाईटवरील स्कोअर बोर्डमध्ये 38 चेंडूत 67 धावा असे लिहण्यात आले होते. धावसंख्या चुकीची लिहली ही चूक एखाद वेळी मान्य देखील केली जाईल. पण जो खेळाडू संघातच नाही त्याचे नाव सलामीवीर म्हणून लिहण्यात आले आणि त्याच्या नावासमोर अर्धशतक देखील झळकावण्यात आले. अखिल हरवाडकर या सामन्यात अंतिम 11 जणांमध्ये नव्हता. एवढ्यावर बीसीसीआय थांबले नाही, त्यांनी मुंबईचा दुसरा समालमीवर आदित्य तारे याच्या धावसंख्येत देखील मोठी चूक केली.

बीसीसीआयच्या या चूकीवरून आता सोशल मीडियावर क्रिकेट चाहते त्यांना ट्रोल करत आहेत. बीसीसीआयने जशी चूक वेबसाईटवर केली तशीच सोशल मीडियावर देखील केली. बीसीसीआयच्या डोमेस्टिक ट्विटर अकांऊटवर पृथ्वी शॉने अर्ध शतकी खेळी केल्यानंतर आनंद साजरा करत असतानाचा फोटो शेअर केला. पण सोबत शेअर केलेल्या लिंकवर नाव मात्र चूकीचे दिसत होते.

बीसीसीआयच्या या चूकीवर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. नेटिझन्सनी बीसीसीआयला यावरून चांगलेच ट्रोल केले. तर काही युझर्सनी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुलीला या प्रकरणाकडे लक्ष घालण्याची विनंती केली.

आठ महिन्यानंतर परतला पृथ्वी

पृथ्वी शॉने 2017मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताला 19 वर्षाखालील वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्यानंतर गेल्यावर्षी पृथ्वीला भारतीय संघात स्थान मिळाले होते. पृथ्वीने वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करताना शतकी खेळी केली होती. कसोटीमध्ये पदार्पणातच शतक करणारा तो सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. पण त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सराव सराव करताना त्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्याला संघाबाहेर रहावे लागले होते. तर याच वर्षी जुलै महिन्यात डोपिंग प्रकरणी दोषी आढळ्यानंतर आठ महिन्यासाठी बंदी घालण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 01:57 PM IST

ताज्या बातम्या