‘पैसे नाही घेत पण...’, BCCIच्या अधिकाऱ्याचे द्रविडवर गंभीर आरोप

Dravid Conflict of Interest : द्रविडला बीसीसीआय़ने हितसंबंध आड येत असल्याबद्दल नोटीस पाठवली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 07:13 PM IST

‘पैसे नाही घेत पण...’, BCCIच्या अधिकाऱ्याचे द्रविडवर गंभीर आरोप

मुंबई, 08 ऑगस्ट : भारताचा माजी कर्णधार आणि अंडर-19चा मुख्य कोच राहुल द्रविडला बीसीसीआय़ने हितसंबंध आड येत असल्याबद्दल नोटीस पाठवली होती. याबाबत आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं या संदर्भात द्रविडवर गंभीर आरोप केले आहेत. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख आहे. त्याच्यावर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन सदस्य असलेल्या संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयच्या नियमांचं उल्लंघन करत हितसंबंध जपल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बीसीसीआय़कडून द्रविडला नोटीस पाठवण्यात आली होती.

यासंदर्भात बीसीसीआयचे अधिकारी डी.के. जैन यांनी द्रविडवर आरोप केले आहेत. डी.के. जैन यांनी, “बीसीसीआयनं दिलेल्या नियमांचे पालन करने बंधनकारक आहे. त्यामुळं कोणीही ते नियम मोडत असतील तर त्यांच्यावर कारवाई होईलच”, असे सांगितले होते. त्याचबरोबर द्रविडवर आरोप करत, “मला द्रविडबाबात नियम भंग केल्याची सुचना आली, आणि मी त्याला नोटीस पाठवली. मला उत्तराची अपेक्षा आहे. नोकरीतून सुट्टी घेणे म्हणजे तुमच्याकडे ती पोस्ट नाही असे नाही”, असे खडसावले. त्यामुळं द्रविडला आता 14 दिवसात याबाबत उत्तर द्यावे लागणार आहे.

द्रविडवर यामुळं केला जात आहे आरोप

द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत काम करतो. त्याशिवाय इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष असून या ग्रुपचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ खेळत आहे. याबद्दल राहुल द्रविडला मोटीस पाठवण्यात आली होती. हितसंबंध जपण्याच्या मुद्द्यावरून पाठवलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. त्याच्या उत्तरानंतर पुढच्या कारवाईवर विचार करण्यात येईल असं बीसीसीआय़कडून सांगण्यात आलं होतं. द्रविडला 16 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे.

गांगुली आणि हरभजननं व्यक्त केला होता राग

Loading...

बीसीसीआयनं द्रविडला नोटीस पाठवल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी राग व्यक्त केला आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कठोर शब्दांत टीका केली आहे. भारतीय क्रिकेटपटूमंध्ये नवीन फॅशन आली आहे. चर्चेत राहण्यासाठी हितसंबंधाचा प्रश्न पुढं आणणे हा सर्वोत्तम मार्ग बनत चालला आहे. देवा, भारतीय क्रिकेटला वाचव असंही गांगुलीने म्हटंल आहे. भारताची द वॉल अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडला नोटीस पाठवल्याचं समजल्यानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेसुद्धा बीसीसीआयवर हल्लाबोल केला आहे. भारतीय क्रिकेटला द्रविडसारखा चांगला माणूस मिळणार नाही. अशा प्रकारची नोटीस पाठवून द्रविडचा अपमान केला आहे. भारताच्या क्रिकेटला त्याची गरज आहे.

आईने प्राण सोडले पण लेकरू सोडलं नाही, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 07:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...