BCCI ला धोनीचा पडला विसर, भडकलेल्या चाहत्यांनी काढला राग

BCCI ला धोनीचा पडला विसर, भडकलेल्या चाहत्यांनी काढला राग

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याच्या कमबॅकबद्दल शंकाही व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

नवी, दिल्ली, 21 मार्च : टीम इंडियाला आयसीसीचे तीनही कप जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी20 वर्ल्ज कप, 2011 मध्ये वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. मात्र आता धोनी संघातून बाहेर आहे. त्याच्या पुनरागमनाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. 2019 च्या वर्ल़्ड कप सेमीफायनलपासून धोनी संघात खेळलेला नाही. त्यानंतर धोनीचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही संपलं आहे. आता बीसीसीआय़ने शेअर केलेल्या फोटोमध्ये धोनी नसल्यानं चाहते भडकले आहेत.

बीसीसीआयने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर पेज इंडियन क्रिकेट टीमचे 13 मिलियन फॉलोअर्स झाल्याबद्दल एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये बीसीसीआयने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये बीसीसीआयने भारताच्या 9 क्रिकेटपटूंचा फोटो लावला आहे. यात पुरुष संघातील विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. तर महिला क्रिकेट संघातील स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, पूनम यादव यांचे फोटो आहेत. यामध्ये धोनीचा फोटो नसल्यानं त्याचे चाहते नाराज झाले.

 

View this post on Instagram

 

A 13 Million strong family 🙏🙏 Thank you for your love and support 💙💙

A post shared by Team India (@indiancricketteam) on

चाहत्यांनी बीसीसीआय़च्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. चाहत्यांनी म्हटलं की, बीसीसीआयच्या इन्स्टाग्राम पेज फेमस होण्यात धोनीचाही तितकाच वाटा आहे जितका विराट, बुमराह या खेळाडूंचा आहे. त्याचा फोटो न लावणं हा धोनीचा अपमान असल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे. काही चाहत्यांनी धोनीशिवाय टीम इंडिया काहीच नाही असं म्हटलं आहे. धोनीमुळे ते बीबीसीसीआयच्या पेजला फॉलो करतात असंही म्हटलं आहे.

हे वाचा : भारताच्या या क्रिकेटपटूकडं नाही मोबाइल, पत्नीच्या फोनवरून करतो कॉल

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागनेसुद्धा धोनीचं कमबॅक कठीण असल्याचं सांगितलं होतं. त्याने म्हटलं की, धोनी कोणाच्या जागी फिट होणार. संघात केएल राहुल आणि ऋषभ पंत हे दोघेही आहेत. त्यात राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळं या संघात बदल करून पुढे जाण्याचा पर्याय दिसत नाही असं म्हणत सेहवागनं अप्रत्यक्ष धोनीचं कमबॅक जवळपास शक्य नसल्याचंच म्हटलं आहे.

हे वाचा : टीम इंडियाच्या जादुगरची जादू पाहिलीत का? BCCI ने शेअर केला VIDEO

First published: March 21, 2020, 11:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading