पुलवामा हल्ला : BCCI ने IPL बाबत घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय

पुलवामा इथं झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 03:51 PM IST

पुलवामा हल्ला : BCCI ने IPL बाबत घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : पुलवामा इथं झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा आयपीएलचं उद्घाटन थाटामाटात होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.

आयपीएलच्या उद्घाटनाचा खर्च टाळून ती रक्कम शहिदांच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे. याबाबत बीसीसीआय़च्या प्रशासकीय समितीनी माहिती दिली आहे.

दरम्यान, इंग्लंडमध्ये मे महिन्यात होणाऱ्या ICC वर्ल्डकप स्पर्धेत कदाचित भारत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानसोबत सामना खेळायचा की नाही याबाबत सरकार जो निर्णय घेईल तो निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मान्य असेल. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान सोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास उत्सुक नाही. केंद्राच्या या निर्णयाला बीसीसीआयने पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका गेल्या अनेक वर्षापासून बंद आहेत. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याने केंद्र सरकारने दोन्ही देशातील क्रिकेटचे सामने खेळण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे हे दोन्ही देश केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकमेकांच्या विरुद्ध लढतात. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यास नकार दिला होता. पण पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध आणखी तणावाचे झाले आहेत. यामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.


Loading...

VIDEO : बाळासह आई गाडीतून पडली, ट्रकखाली येण्यापासून थोडक्यात बचावला चिमुकला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 03:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...