BCCIच्या वादग्रस्त नियमावर आज होणार चर्चा, राहुल द्रविड-लक्ष्मण यांची होणार चौकशी

BCCIच्या वादग्रस्त नियमावर आज होणार चर्चा, राहुल द्रविड-लक्ष्मण यांची होणार चौकशी

माजी क्रिकेटर आज बीसीसीआयच्या मुख्यालयात वादग्रस्त नियमांवर चर्चा करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : माजी क्रिकेटर आज बीसीसीआयच्या मुख्यालयात वादग्रस्त नियमांवर चर्चा करणार आहे. यात ज्या खेळाडूंनी परस्पर हितसंबंध जोपासले होते, ते सर्व खेळाडू या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यात प्रशासकिय समितीचा एक सदस्य उपस्थित होणार आहे. विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली अन्य सदस्य डायना इडुल्जी, सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल रवि थोडगेही उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर आणि जलद गोलंदाज अजित आगरकरही या बैठकीत असतील. या बैठकीत लक्ष्मण आणि राहुल द्रविडही उपस्थित राहणार आहेत. भारताचा माजी कर्णधार आणि अंडर-19चा मुख्य कोच राहुल द्रविडला बीसीसीआय़ने हितसंबंध आड येत असल्याबद्दल नोटीस पाठवली होती. द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत काम करतो. त्याशिवाय इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष असून या ग्रुपचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ खेळत आहे. याबद्दल राहुल द्रविडला मोटीस पाठवण्यात आली होती. हितसंबंध जपण्याच्या मुद्द्यावरून पाठवलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती.

वाचा-जोफ्रा आर्चर म्हणजे फलंदाजांचा कर्दनकाळ! आतापर्यंत 7 फलंदाजांना केले जखमी

तेंडुलकर आणि हरभजन उपस्थित राहणार नाहीत

द्रविडच्याआधी लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर परस्पर हितसंबंध जोपासल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, सचिन तेंडुलकर या बैठकीला उपस्थित राहणार नाही आहे. त्याचबरोबर भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगही अनुपस्थित असणार आहे. याबाबत या दोघांनीही बीसीसीआयला लेखी स्पष्टिकरण दिले आहे.

वाचा-इशांत शर्माची तुफानी गोलंदाजी, स्वस्तात आटपला वेस्ट इंडिजचा डाव

द्रविडवर केलेल्या आरोपावर दिग्गजांनी व्यक्त केला होता राग

बीसीसीआयनं द्रविडला नोटीस पाठवल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी राग व्यक्त केला आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आणि अनिल कुंबळे यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे. भारतीय क्रिकेटपटूमंध्ये नवीन फॅशन आली आहे. चर्चेत राहण्यासाठी हितसंबंधाचा प्रश्न पुढं आणणे हा सर्वोत्तम मार्ग बनत चालला आहे. देवा, भारतीय क्रिकेटला वाचव असंही गांगुलीने म्हटंल आहे. भारताची द वॉल अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडला नोटीस पाठवल्याचं समजल्यानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेसुद्धा बीसीसीआयवर हल्लाबोल केला आहे. भारतीय क्रिकेटला द्रविडसारखा चांगला माणूस मिळणार नाही. अशा प्रकारची नोटीस पाठवून द्रविडचा अपमान केला आहे. भारताच्या क्रिकेटला त्याची गरज आहे.

वाचा-टीम इंडियाला धोका असल्याची पाकिस्तानमध्ये चर्चा, BCCIने केला खुलासा!

मद्यधुंद तरुणाच्या कारनं 7 जणांना उडवलं, भीषण दुर्घटनेचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 11:18 AM IST

ताज्या बातम्या