मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL होणार आणखी मोठी! BCCI ने मागवली टेंडर, पाहा काय आहेत अटी

IPL होणार आणखी मोठी! BCCI ने मागवली टेंडर, पाहा काय आहेत अटी

IPL च्या टीम आणखी वाढणार, बीसीसीआयने मागवली टेंडर

IPL च्या टीम आणखी वाढणार, बीसीसीआयने मागवली टेंडर

IPL च्या 15 व्या मोसमाआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुढच्या मोसमात आयपीएलच्या आणखी 2 टीम खेळताना दिसतील. यासाठी बीसीसीआयने (BCCI) टेंडर प्रसिद्ध केलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 31 ऑगस्ट : IPL च्या 15 व्या मोसमाआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुढच्या मोसमात आयपीएलच्या आणखी 2 टीम खेळताना दिसतील. यासाठी बीसीसीआयने (BCCI) टेंडर प्रसिद्ध केलं आहे. दोन नव्या टीमच्या टेंडरसाठी बीसीसीआयने 5 ऑक्टोबरची डेडलाईन ठेवली आहे. हे टेंडर डॉक्युमेंट 10 लाख रुपयांमध्ये विकत घेण्यात येईल. यामध्ये टीम विकत घेण्याची पात्रता, बोली लावण्याची प्रक्रिया, प्रस्तावित नवीन टीमच्या अधिकाऱ्यांबाबतची माहिती असेल. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार बोली लावण्यासाठी इच्छूक असणाऱ्या कंपनीला इनव्हिटेशन टू टेंडर म्हणजेच आयटीटी विकत घ्यावं लागणार आहे.

फक्त आयटीटी विकत घेऊन कोणीही आयपीएल टीमवर बोली लावू शकणार नाही. यासाठी अन्य अटी आणि शर्थींचं पाल करावं लागणार आहे. एवढच नाही तर बीसीसीआयला कोणतंही कारण न देता बोली प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने एका टीमची बेस प्राईज 2 हजार कोटी रुपये ठेवली आहे, त्यामुळे दोन टीमकडून त्यांना 5 हजार कोटी रुपये मिळू शकतात. पुढच्या मोसमात 60 ऐवजी 74 मॅच खेळवल्या जातील. सध्याच्या मोसमातल्या उरलेल्या 31 मॅच 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत नव्या टीमच्या बोली प्रक्रियेबाबत अंतिम चर्चा झाली होती. दोन नव्या टीमची बेस प्राईज प्रत्येकी 1700 कोटी रुपये ठेवण्याचा विचार केले गेला होता, पण आता ही किंमत 2000 कोटी रुपये ठेवण्याचं निश्चित केलं गेलं आहे, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं.

वर्षाला 3 हजार कोटींपेक्षा जास्तचा टर्न ओव्हर असणाऱ्या कंपनीला बोली प्रक्रियेत सहभागी व्हायची परवानगी दिली जाईल. तसंच कंपनींच्या समुहाला टीम विकत घ्यायला परवानगी देण्याबाबतही बीसीसीआय विचार करत आहे. जर तीन कंपन्या एकत्र येऊन टीमसाठी बोली लावत असतील, तर बीसीसीआयला यामध्ये कोणतीही अडचण नाही. यामुळे अधिकचे पैसे मिळतील, असं बीसीसीआयला वाटत आहे.

First published:

Tags: BCCI, Ipl