डॉक्टरांच्या बैठकीत निर्णय वुडलँड हॉस्पिटलच्या बोर्डाची सोमवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये गांगुलीच्या तब्येतीवर चर्चा करण्यात आली. गांगुलीच्या तब्येतीचे सर्व अपडेट्स त्याच्या कुटुंबीयांना यावेळी देण्यात आले. या बैठकीनंतरच गांगुलीला बुधवारी डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गांगुलीच्या हृदयातल्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाले आहेत, यातल्या एका रक्तवाहिनीत तर 90 टक्के बॉल्क झाल्याचं रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर गांगुलीला एक महिना विश्रांती घ्यावी लागेल, त्यानंतरच तो नेहमीप्रमाणे आयुष्य जगू शकेल. (हे वाचा-IND Vs AUS: सिडनी टेस्टसाठी महत्त्वाच्या ठरतील या मैदानावरच्या 9 खास गोष्टी) देशभरातून प्रार्थना गांगुलीला ऱ्हदयविकाराचा सौम्य धक्का बसल्याची बातमी समजताच देशभरातून त्याच्या तब्येतीविषयी प्रार्थना करण्यात येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारीच रुग्णालयात जाऊन सौरव गांगुलीच्या तब्येतीची विचारपूस केली, तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली यांना फोन करून दादाच्या तब्येतीची चौकशी केली. केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी कोलकात्याच्या हॉस्पिटलमध्ये जावून गांगुलीची भेट घेतली. ‘गांगुलीनं अनेक संकटांचा सामना केला आहे. तो लवकरच यामधून बाहेर पडेल’, असा विश्वास ठाकूर यांनी या भेटीनंतर व्यक्त केला.Sourav Ganguly will be ready for the next course of procedures or medical intervention after about 2-3 weeks: Dr Rupali Basu MD & CEO Woodlands Hospital, Kolkata https://t.co/BomM5kDGIG
— ANI (@ANI) January 5, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sourav ganguly