World Cup च्या संघातून रायडुला का वगळले? निवड समितीच्या प्रमुखांनी केला खुलासा

वर्ल्ड कपच्या संघात निवड न झाल्यानं अंबाती रायडुने अचानक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 10:20 AM IST

World Cup च्या संघातून रायडुला का वगळले? निवड समितीच्या प्रमुखांनी केला खुलासा

मुंबई, 21 जुलै : वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारताचा संघ जाहीर कऱण्यात आला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत अंबाती रायडुची वर्ल्ड कपच्या संघात निवड का झाली नाही असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी याबाबात मोठा खुलासा केला.

एमएसके प्रसाद म्हणाले की, जेव्हा रायडुला टी 20 मधील कामगिरीच्या आधारावर संघात घेतलं तेव्हा निवड समितीवर टीका करण्यात आली. त्यानंतरही रायडुबद्दल विचार केला. जेव्हा तो फिटनेस टेस्ट मध्ये फेल झाला तेव्हा आम्ही फिटनेस प्रोग्रॅम करून घेतला. मात्र त्यानंतरही वर्ल्ड कपच्या संघात तो फिट होऊ शकला नाही. यासाठी तुम्ही निवड समितीने पक्षपात केला असं म्हणू शकत नाही.

अंबाती रायडुने वर्ल्ड कपचा संघ जाहीर झाल्यानंतर 3डी ट्वीट केलं होतं. त्यावरही एमएसके प्रसाद यांनी फिरकी घेतली. रायडुचं ट्वीट मजेशीर होतं. मला छान वाटलं. दरम्यान, अंबाती रायडुने तीन वेळा वर्ल्ड कपमध्ये निवड न झाल्यानं तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा, सिखर धवन, विराट कोहली(कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

Loading...

टी20 संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी

कसोटी संघ : मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, अश्विन, जडेजा, कुलदीप यादव इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौऱा 3 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने, 3 वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्टपासून वनडे तर 22 ऑगस्टला पहिला कसोटी सामना सुरू होईल.

World Cup गाजवणाऱ्या खेळाडूवर BCCI करणार कारवाई?

गब्बर इज बॅक! वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

VIDEO: काँग्रेसची अवस्था सांगताना रावसाहेब दानवेंनी सांगितला विनोदी किस्सा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 10:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...