रोहित-विराट वाढता वाद, बीसीसीआय प्रमुखांनी केला मोठा खुलासा

रोहित-विराट वाढता वाद, बीसीसीआय प्रमुखांनी केला मोठा खुलासा

वर्ल्ड कपनंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. यातच भारतीय संघात गटबाजी होत असल्याचेही समोर आले होते.

वर्ल़्ड कपनंतर विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. यात पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री चर्चा न करता निर्णय घेतात, त्यामुळं संघाचे नुकसान होत आहे. त्यामुळं रोहितकडे संघाचे कर्णधारपद जाणार अशी चर्चा होती. मात्र निवड समितीनं विराटकडेच संघाचे कर्णधार पद दिले आहे. या सगळ्या प्रकरणावर बीसीसीआयच्या प्रमुखांनी भाष्य केले आहे.

बीसीसीआयचे प्रमुख विनोद राय यांनी, विराट-रोहितमध्ये कोणताच वाद नसल्याते मत व्यक्त केले आहे. राय यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, "मीडियानं या बातम्या पसरवल्या आहेत. यात काहीच तथ्य नाही. भारतीय संघात कोणतीही गटबाजी नाही आहे", असे परखड मत व्यक्त केले आहे.

वाचा-अनुष्का शर्माचा हिटमॅनवर पलटवार, रोहित-विराट वाद चिघळला!

रोहितनं केले अनुष्काला अनफॉलो

रोहित-विराट वर्ल्ड कपनंतर एकमेकांशी बोललेही नाही आहेत. दरम्यान आता रोहितनं विराटची पत्नी अनुष्का शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यामुळं आता या वादाला नवा रंग आला आहे.रोहितनं यापूर्वी कोहलीलाही अनफॉलो केले होते.पण, कोहली इंस्टाग्रामवर अजूनही रोहितला फॉलो करतो. पण, रोहितची पत्नी कोहलीच्या फ्रेंड लिस्टमध्ये अजूनही नाही.

रोहितनं केली होती विराटला हटवण्याची मागणी

याआधी गल्फ न्यूजनं प्रसिध्द केलेल्या बातमीनुसार, सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवाला विराट कोहलीचे जबाबदार असल्याचे मत रोहितनं व्यक्त केले होते. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी करण्यात रोहितनं केली होती.

वाचा- अमेरिकेनं नाकारला शमीचा व्हिसा, BCCIनं उचललं 'हे' पाऊल

अशी होती संघात गटबाजी

सुत्रांच्या माहितीनुसार क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा कर्णधार विराट कोहलीला पाठींबा आहे. त्यामुळेच आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव होऊनही विराटवर कारवाई करण्यात आली नव्हती, असा आरोप करण्यात आला होता.

वाचा- टेस्ट वर्ल्ड कपच्या रणसंग्रामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात, असे आहेत नियम

'त्या' 7 प्रवाशांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 02:25 PM IST

ताज्या बातम्या