Home /News /sport /

BCCI या देशात उरलेली IPL खेळवण्यास उत्सुक, समोर आलं कारण

BCCI या देशात उरलेली IPL खेळवण्यास उत्सुक, समोर आलं कारण

कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2021) स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. यानंतर आता उरलेले 31 सामने खेळवण्यासाठी बीसीसीआय (BCCI) प्रयत्नशील आहे. अंतरिम सीईओ हेमांग अमीन (Hemang Amin) यांनी आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांसाठी दोन वेळापत्रकं तयार केली आहेत. ही दोन वेळापत्रकं युएई (UAE) आणि इंग्लंड (England) ही ठिकाणं लक्षात घेऊन बनवण्यात आली आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 मे : कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2021) स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. यानंतर आता उरलेले 31 सामने खेळवण्यासाठी बीसीसीआय (BCCI) प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संशय असल्यामुळे बीसीसीआय आयपीएलच्या उरलेल्या मॅच भारतात आयोजित करू इच्छित नाही. बीसीसीआयचे अंतरिम सीईओ हेमांग अमीन (Hemang Amin) यांनी आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांसाठी दोन वेळापत्रकं तयार केली आहेत. ही दोन वेळापत्रकं युएई (UAE) आणि इंग्लंड (England) ही ठिकाणं लक्षात घेऊन बनवण्यात आली आहेत. 29 मे रोजी बीसीसीआयच्या स्पेशल एजीएमचं आयजोन करण्यात आलं आहे. या बैठकीत अमीन इंग्लंड आणि युएईचा प्रस्ताव ठेवतील. या दोन ठिकाणांचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असला तरी अमीन यांची पहिली पसंती युएईला आहे. उरलेल्या आयपीएलसाठी सप्टेंबर-ऑक्टोबर मधला कालावधी ठरवला जात आहे. मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा 13 वा मोसम युएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. याची जबाबदारीही अमीन यांच्या खांद्यावरच होती. आयपीएलच्या सफल आयोजनामुळे फ्रॅन्चायजी, बोर्ड आणि आयपीएलशी जोडल्या गेलेल्या अनेकांनी हेमांग अमीन यांचं कौतुक केलं होतं. टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार हेमांग अमीन स्पेशल एजीएममध्ये आयपीएल इंग्लंड आणि युएईमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव ठेवतील, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमीन युएईमध्येच आयपीएल खेळवण्यासाठी आग्रही आहेत. युएईमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी तीन कारणं समोर आली आहेत. यामध्ये युएईला आयपीएल खेळवण्याचा अनुभव, सप्टेंबर-ऑक्टोबरमधलं तिथलं वातावरण आणि इंग्लंडच्या तुलनेत कमी होणारा खर्च ही प्रमुख कारणं समोर आली आहेत. युएईला अनुभव युएईने याआधी 2020 साली कोरोना व्हायरसमुळे बायो-बबलमध्ये आयपीएलचं सफल आयोजन केलं होतं. तर 2014 साली लोकसभा निवडणुकींमुळे युएईमध्येच अर्धी आयपीएल खेळवण्यात आली होती, त्यामुळे युएईकडे आयपीएलचं आयोजन करण्याचा अनुभव आहे, तर दुसरीकडे इंग्लंडने मात्र आतापर्यंत आयपीएलचं आयोजन केलेलं नाही. एमिरेट्स क्रिकेट बोर्डानेही बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन करण्याची ऑफर दिली आहे. युएईचा मोसम बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळवण्याचा विचार करत आहे. या कालावधीमध्ये इंग्लंडमध्ये पावसाची शक्यता आहे, त्यामुळे अनेक सामने रद्दही होऊ शकतात आणि बीसीसीआयच्या अडचणी वाढू शकतात. तर युएईमध्ये याच कालावधीमध्ये हवा थंड असते आणि तिकडे पावसाची शक्यताही कमी आहे. मागच्या वर्षीही याच कालावधीमध्ये युएईत आयपीएलचं आयोजन करण्यात आलं होतं. कमी खर्च इंग्लंडच्या तुलनेत युएईमध्ये आयपीएल आयोजनाचा खर्च कमी होईल, कारण दोन्ही देशांमध्ये चलन मूल्यात खूप फरक आहे. याशिवाय इंग्लंडमध्ये हॉटेल, स्टेडियम आणि ट्रेनिंग सुविधांसाठी लागणारा खर्चही जास्त आहे. याशिवाय युएईमध्ये सगळ्या टीमसाठी सेंट्रल बायो-बबल बनवणं सोपं आहे. टीमना ज्या हॉटेलमध्ये ठेवायचं आहे, त्या हॉटेलना मागच्या वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे फ्रॅन्चायजीही आयपीएलसाठी युएई हाच चांगला पर्याय असल्याचं म्हणत आहेत. टी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. भारतातली कोरोनाची परिस्थिती बघता, हा वर्ल्ड कपही युएईमध्येच होण्याची शक्यता सर्वाधिक आहे, त्यामुळे आयपीएलचे उरलेले सामनेही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत खेळवले तर खेळाडूही उपलब्ध होतील. पण टी-20 वर्ल्ड कप नंतर मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी आयपीएल खेळायला नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उपलब्ध नसतील, तर बीसीसीआयला आयपीएल खेळवणंही कठीण होईल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Coronavirus, England, IPL 2021, UAE

    पुढील बातम्या