टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड सर्वांच्या सहमतीनं नाही, प्रशासकीय समितीनं केला 'हा' खुलासा!

टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ विंडीज दौऱ्यापर्यंत असून लवकरच नवा प्रशिक्षक मिळणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 10:56 AM IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड सर्वांच्या सहमतीनं नाही, प्रशासकीय समितीनं केला 'हा' खुलासा!

मुंबई, 06 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ विंडीज दौऱ्यानंतर संपणार आहे. त्यानंतर भारताला नवा प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकाची निवड करणार आहे. यामध्ये सर्वांच्या सहमतीने नाही तर दोन-एक अशा बहुमतानं प्रशिक्षक निवडला जाईल असं बीसीसीआयच्या प्रशासन समितीनं स्पष्ट केलं आहे.

प्रशासकीय समितीनं दिलेल्या माहितीत, टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठी तारीख ठरली आहे असे सांगितले. तसेच, या कपिल देव यांच्या समितीनं घेतलेला निर्णय अंतिम असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळं 15 ऑगस्टच्या आसपास टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळू शकतो.

बीसीसीआयच्या निवडणूकांआधी होणार निर्णय

22 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयच्या निवडणूका होणार आहेत.या 26 राज्य लोढाच्या नियमांचे पालन करत आहेत. त्यामुळं प्रत्येक राज्यात एक अधिकारी तैनात केला जाणार आहे. या सगळ्याचा विचार करता ऑगस्टमध्येच टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा प्रश्न मार्गी लावला जाऊ शकतो.

वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कोचिंग स्टाफचा कार्य़काळ

Loading...

सध्या कार्यरत असलेल्या भारताच्या कोचिंग स्टाफचा कार्य़काळ हा वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत म्हणजेच 45 दिवस वाढवण्यात आला आहे. यात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरूण, फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा समावेश आहे.

त्रिसदस्यीय समिती

कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव यांच्याशिवाय माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता गंतास्वामी आहेत.

ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाला अपयश मिळाल्यानंतर BCCIने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी नव्याने अर्ज मागवले होते. तसेच प्रशिक्षकासाठी बीसीसीआयनं अर्ज करणाऱ्यांचे वय हे 60 पेक्षा कमी असावे आणि त्या उमेदवाराला किमान 2 वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव अशी अटही ठेवली.

VIDEO: गावी जाण्याच्या विचारात असाल तर थांबा, पुणे-बंगळुरू महामार्गावर TRAFFIC जाम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 6, 2019 10:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...