मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL साठी कायपण! BCCI ने इंग्लंडकडे केली मोठी मागणी

IPL साठी कायपण! BCCI ने इंग्लंडकडे केली मोठी मागणी

कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षीची आयपीएल (IPL 2021) अर्ध्यातच स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयला (BCCI) घ्यावा लागला. यानंतर आता आयपीएलचे उरलेले सामने आयोजित करण्याचं मोठं आव्हान बीसीसीआयपुढे आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 24 मे : कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षीची आयपीएल (IPL 2021) अर्ध्यातच स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयला (BCCI) घ्यावा लागला. यानंतर आता आयपीएलचे उरलेले सामने आयोजित करण्याचं मोठं आव्हान बीसीसीआयपुढे आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय सप्टेंबर महिन्यात आयपीएलचं इंग्लंडमध्ये आयोजन करू इच्छिते, यासाठी त्यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी (ECB) संपर्कही साधला आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या टेस्ट सीरिजच्या कार्यक्रमात बदल व्हावेत, ज्यामुळे आयपीएलचं आयोजन करण्यात येईल, अशी मागणी बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे केली आहे.

इंग्लंडमधलं वृत्तपत्र द टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला विनंती केली, की पहिली टेस्ट एक आठवडा लवकर सुरू करा किंवा सीरिजची पाचवी टेस्ट रद्द करा. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे, तर सीरिजची पाचवी आणि अखेरची टेस्ट 10 सप्टेंबरला होईल.

इंग्लंडच्या काऊंटी टीमनीही बीसीसीआयला आयपीएल आपल्याकडे आयोजित करण्याची ऑफर दिली होती. जर बीसीसीआयने आयपीएलचं आयोजन इंग्लंडमध्ये केलं तर इंग्लंड क्रिकेट बोर्डाला मोठा फायदा होईल. बोर्डाला कोरोना व्हायरसमुळे आधीच खूप आर्थिक नुकसान झालं आहे, त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड बीसीसीआयच्या या ऑफरचा विचार करू शकतं.

आयपीएलचे उरलेले सामने इंग्लंडमध्ये खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार असला, तरी तिथला मोसम मात्र अडचणीचा ठरू शकतो. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसार (Monty Panesar) याने आयपीएलचं इंग्लंडमध्ये आयोजन होऊ नये, असा सल्ला दिला आहे. इंग्लंडमध्ये आयपीएल आयोजित करण्यात आली, तर पावसामुळे अनेक सामन्यांमध्ये व्यत्यय येईल, तसंच पावसामुळे मॅच रद्दही कराव्या लागू शकतात, असं पनेसार म्हणाला आहे.

First published:

Tags: BCCI, Cricket, England, IPL 2021