Elec-widget

गब्बर इज बॅक! वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

गब्बर इज बॅक! वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

दुखापतीने वर्ल्ड कपला मुकलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले असून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जुलै : ICC Cricket World Cup नंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयच्या निवड समितीने रविवारी मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी संघ जाहीर केला.

वर्ल्ड कपनंतर काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे नेतृत्व देण्यात येईल असं म्हटलं जात होतं. मात्र, विराट वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे.

भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतली असून यष्टीरक्षणाची जबाबदारी युवा खेळाडू ऋषभ पंतच्या खांद्यावर असेल. शिखर धवन अद्याप दुखापतीतून सावरला असून तो वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी तंदुरुस्त झाला आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर 3 ऑगस्टपासून जाणार आहे. यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

Loading...

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा, सिखर धवन, विराट कोहली(कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

टी20 संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी

कसोटी संघ : मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, अश्विन, जडेजा, कुलदीप यादव इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

सांगलीच्या 'गज्या'ने मालकाला केलं कर्जातून मुक्त!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 02:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...