IPL 2019 : अखेर आयपीएलच्या साखळी फेरीचं वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयने अधिकृतरित्या हे वेळापत्रक जाहीर केलं नसले तरी, आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मात्र अजूनही क्लालीफायरचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही.

ram deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 05:26 PM IST

IPL 2019 : अखेर आयपीएलच्या साखळी फेरीचं वेळापत्रक जाहीर

मुंबई, 19 मार्च : लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या 12व्या हंगामाच्या सुरुवातीच्या काही सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. मात्र निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आयपीएलच्या वेळापत्रकाबाबतही क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता होती. अखेर मंगळवारी आयपीएच्या अधिकृत वेबसाईटने साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. मात्र अद्याप क्वालीफायर स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. या वेळापत्रकानुसार, प्रत्येक संघ घरच्या मैदानावर किमान सात सामने खेळणार आहे.
दरम्यान या वेळापत्रकात आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार बीसीसीआयकडे असेल, असंही जाहीर करण्यात आलं आहे. गटविजेता चेन्नई आणि बंगळुरू यांचा 23 मार्चला पहिला सामना होणार आहे. सध्या 23 मार्च ते 5 मे या कालावधीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान 12 मे रोजी अंतिम सामना होण्याची शक्यता काही इंग्रजी वृत्तपत्रांनी वर्तविली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...