BCCI नं हार्दिक पांड्याच्या पगारात केली 2 कोटींची वाढ, वाचा रोहित आणि विराटला किती मिळणार पैसे?

BCCI नं हार्दिक पांड्याच्या पगारात केली 2 कोटींची वाढ, वाचा रोहित आणि विराटला किती मिळणार पैसे?

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) खेळाडूंसोबतचे वार्षिक करार जाहीर केले आहेत. यामध्ये हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) पगार दोन कोटींनी वाढला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) खेळाडूंसोबतचे वार्षिक करार जाहीर केले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डानं एकूण 28 खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. या खेळाडूंची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. सर्वाधिक रकमेच्या A प्लस गटात यंदा तीन खेळाडूंचा समावेश केला आहे.

या वर्षासाठी ज्या खेळाडूंशी करार करण्यात आला आहे. त्यांना त्यांच्या गटानुसार वेगवेगळी रक्कम मिळणार आहे. A प्लस ग्रेडमधील खेळाडूंना 7 कोटी रुपये मिळतील. A ग्रेडमधील खेळाडूंना 5 कोटी रुपये मिळणार आहे. ग्रेड B मधील खेळाडूंना 3 कोटी, तर C ग्रेडमधील खेळाडूंना वर्षभरासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळतील.  A प्लस ग्रेडमध्ये 3, A ग्रेडमध्ये 10, B ग्रेडमध्ये 5 तर C ग्रेडमध्ये 10 खेळाडूंचा समावेश आहे.

A प्लस या सर्वात अव्वल ग्रेडमध्ये विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या या तिघांचा समावेश आहे. टीम इंडियाचे हे सर्व फॉरमॅटमधील अव्वल खेळाडू असून त्यांना इतरांपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत.

नव्या कॅप्टनची कमाल, राजस्थान रॉयल्सनं सुधारली सर्वात मोठी चूक!

बीसीसीआयनं यावेळी अनेक खेळाडूंचे ग्रेड बदलले आहेत. हार्दिक पांड्यांचं (Hardik Pandya) यंदा प्रमोशन झालं आहे. त्याच्या पगारात दोन कोटींची वाढ करण्यात आली असून तो आता A ग्रेडचा खेळाडू बनला आहे. हार्दिकचा पगार आता 5 कोटी झाला आहे.  तर केदार जाधव आणि मनिष पांडे यांना यामधून वगळण्यात आलंय. शुभमन गिल, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांचा C ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर मुंबईकर पृथ्वी शॉचा करारबद्ध खेळाडूमध्ये समावेश नाही.

कोणत्या ग्रेडमध्ये कोणते खेळाडू?

ग्रेड A प्लस:  विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह

ग्रेड A:  आर. अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या

ग्रेड B: वृद्धीमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि मयंक अग्रवाल

ग्रेड C: कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज

Published by: News18 Desk
First published: April 15, 2021, 10:11 PM IST

ताज्या बातम्या