Home /News /sport /

कोरोना संकटानंतर भारतीय क्रिकेटची नवी इनिंग, BCCI ने केली वेळापत्रकाची घोषणा

कोरोना संकटानंतर भारतीय क्रिकेटची नवी इनिंग, BCCI ने केली वेळापत्रकाची घोषणा

कोरोना संकटामुळे जवळपास बंद पडलेल्या भारतीय क्रिकेटला (Indian Cricket) पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) 2021-2022 या मोसमासाठीच्या भारताच्या स्थानिक क्रिकेटच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.

    मुंबई, 3 जुलै : कोरोना संकटामुळे जवळपास बंद पडलेल्या भारतीय क्रिकेटला (Indian Cricket) पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) 2021-2022 या मोसमासाठीच्या भारताच्या स्थानिक क्रिकेटच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. 21 सप्टेंबर 2021 पासून भारताच्या स्थानिक क्रिकेटला सुरुवात होणार आहे. महिला वनडे लीगपासून भारतीय क्रिकेटचा मोसम सुरू होईल, यानंतर 27 ऑक्टोबर 2021 पासून महिलांची वनडे चॅलेंजर ट्रॉफी खेळवली जाईल. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला (Syed Mushtaq Ali Trophy) 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरुवात होईल, तर याची फायनल 12 नोव्हेंबरला खेळवली जाईल. रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) मागचा मोसम रद्द करण्यात आला होता, तर 2019-2020 साली कोरोनामुळे रणजी स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली होती. यावेळचा रणजी मोसम 16 नोव्हेंबर 2021 ते 19 नोव्हेंबर 2022 असे तीन महिने खेळवला जाईल. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) 23 फेब्रुवारी 2022 ते 26 मार्च 2022 या कालावधीमध्ये होईल. यावर्षी स्थानिक स्पर्धांमध्ये एकूण 2,127 सामने होतील. यामध्ये वयोमर्यादा असलेल्या, महिला आणि पुरुष सामन्यांचा समावेश आहे. यावेळचा मोसम खेळाडू आणि संबंधितांच्या आरोग्याची पूर्ण काळजी आणि सुरक्षा घेऊन खेळवला जाईल, असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2021) 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली. आता आयपीएलचे उरलेले सामने युएईमध्ये सप्टेंबर महिन्यात सुरू होतील. तसंच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कपही (T20 World Cup) कोरोनाच्या भीतीमुळे भारताऐवजी युएईमध्येच होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Cricket, India

    पुढील बातम्या