मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कोरोना संकटानंतर भारतात क्रिकेटचं कमबॅक, BCCI ने घोषित केलं Schedule

कोरोना संकटानंतर भारतात क्रिकेटचं कमबॅक, BCCI ने घोषित केलं Schedule

रणजी ट्रॉफीच्या वेळापत्रकाची घोषणा

रणजी ट्रॉफीच्या वेळापत्रकाची घोषणा

बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेटच्या स्थानिक स्पर्धांच्या (Domestic Cricket Schedule) वेळापत्रकाची घोषणा केली आहे. रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) मॅच 6 शहरांमध्ये खेळवल्या जातील.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 31 ऑगस्ट : बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेटच्या स्थानिक स्पर्धांच्या (Domestic Cricket Schedule) वेळापत्रकाची घोषणा केली आहे. रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) मॅच 6 शहरांमध्ये खेळवल्या जातील. फायनलसह नॉकआऊटच्या सगळ्या मॅच कोलकातामध्ये होतील. मागच्यावर्षी कोरोनामुळे पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. तर टी-20 मुश्ताक अली ट्रॉफीचं आयोजनही 6 शहरांमध्ये होईल. नॉकआऊटचे सगळे सामने दिल्लीत खेलवले जातील.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार रणजी ट्रॉफीला 13 जानेवारीपासून सुरुवात होऊ शकते. टीमना 6 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. हे सामने मुंबई, बँगलोर, कोलकाता, अहमदाबाद, त्रिवेंद्रम आणि चेन्नईमध्ये होतील. 5 दिवसांच्या क्वारंटाईनंतर नॉकआऊटचे सामने सुरू होतील. क्वार्टर फायनल 28 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत , सेमी फायनल 12 ते 16 मार्चपर्यंत आणि फायनल 16 ते 20 मार्चपर्यंत होईल. गतविजेत्या सौराष्ट्रला ग्रुप डीमध्ये स्थान मिळालं आहे.

रणजी ट्रॉफीच्या 38 टीमना 6 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. पण तीन मोठ्या टीम कर्नाटक, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, महाराष्ट्र आणि उत्तराखंड यांना एलीट सी ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. या ग्रुपचे सगळे सामने कोलकात्यामध्ये होतील. एलीट ग्रुप एमध्ये गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, सर्व्हिसेस आणि आसाम आहेत, यांचे सामने मुंबईत होतील.

बी ग्रुपमध्ये असलेल्या बंगाल, विदर्भ, राजस्थान, केरळ, हरियाणा आणि त्रिपुरा बँगलोरमध्ये खेळतील. ग्रुप डीमध्ये असलेल्या सौराष्ट्र, तामीळनाडू, रेल्वे, जम्मू-काश्मीर, झारखंड आणि गोवा अहमदाबादमध्ये खेळेल. ग्रुप इ मध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बडोदा, ओडिसा, छत्तीसगड आणि पुदुच्चेरी या टीमच्या मॅच त्रिवेंद्रममध्ये होणार आहेत. तर प्लेट ग्रुपच्या 8 टीम चंडीगड, मेघालय, बिहार, नागालँड, मणीपूर, मिजोराम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश चेन्नईत खेळतील.

स्थानिक टी-20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचे सामने 4 नोव्हेंबरपासून होणार आहेत. लखनऊ, गुवाहाटी, बडोदा, दिल्ली, हरियाणा आणि विजयवाडा या शहरांमध्ये मुश्ताक अली स्पर्धा खेळवली जाईल. नॉकआऊटचे सामने 16 नोव्हेंबरपासून तर फायनल 22 नोव्हेंबरला होईल. बोर्डाने विजय हजारे वनडे स्पर्धेच्या ठिकाणांची अजून माहिती दिलेली नाही. ही स्पर्धा 8 ते 27 डिसेंबरदरम्यान होणार आहे.

First published:

Tags: BCCI