BCCI मध्ये महाराष्ट्राची कन्या, निर्णय प्रक्रियेत बजावणार महत्त्वाची भूमिका

BCCI मध्ये महाराष्ट्राची कन्या, निर्णय प्रक्रियेत बजावणार महत्त्वाची भूमिका

बीसीसीआयने नुकतीच क्रिकेट सल्लागार समितीमध्ये निवड झालेल्या तिघांची नावे जाहीर केली.

  • Share this:

मुंबई, 01 जानेवारी : बीसीसीआयने नुकतीच क्रिकेट सल्लागार समितीमध्ये निवड झालेल्या तिघांची नावे जाहीर केली. या तिघांमध्ये महाराष्ट्रातील कन्येचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक खेळाडू भारतीय क्रिकेट संघात आहेत. पण बीसीसीआय़च्या मोठ्या पदांवर मात्र हे खेळाडू कमीच दिसतात. आता मात्र क्रिकेट संघाच्या निवडीत महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या अध्यक्षांची तसेच प्रशिक्षकांची निवड करणाऱ्या समितीमध्ये महाराष्ट्रातील कन्येचा समावेश करण्यात आला आहे.

निवड समिती सदस्यांची निवड बीसीसीआय लवकरच करणार आहे. सध्याचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. या दोन पदांसाठी निवड समितीने अर्ज मागवले आहेत. यांची निवड करण्यासाठी क्रिकेट सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये भारताची माजी यष्टीरक्षक सुलक्षणा नाईकची निवड करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीकडून निवड समिती सदस्य, भारताच्या प्रशिक्षकांची निवड यामध्ये महत्वाची भूमिका असते.

क्रिकेट सल्लागार समितीमध्ये सुलक्षणा नाईक यांच्याशिवाय माजी अष्टपैलू खेळाडू मदनलाल, वेगवान गोलंदाज आरपी सिंग यांचाही समावेश आहे. या तिघांचा समावेश असलेली समिती निवड समितीच्या सदस्यांची निवड कऱणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली.

वाचा : दुखापतीमुळं संपणार भारतीय खेळाडूचे करिअर? न्युझीलंड दौऱ्यातून घेतली माघार

वाचा : कोहलीच्या रॉकेट थ्रोने किवींच्या तोंडचा घास पळवला, 'त्या' रनआऊटने बदलला सामना

 

First published: February 1, 2020, 6:22 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या