मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

India vs Sri Lanka : हेअर ड्रायर आणि इस्त्री वापरणाऱ्यांवर भडकला गांगुली, BCCI करणार कारवाई

India vs Sri Lanka : हेअर ड्रायर आणि इस्त्री वापरणाऱ्यांवर भडकला गांगुली, BCCI करणार कारवाई

BCCI ने भारताची लाज काढल्यानंतर अधिकाऱ्यांना आली जाग, संबंधितांवर होणार कारवाई.

BCCI ने भारताची लाज काढल्यानंतर अधिकाऱ्यांना आली जाग, संबंधितांवर होणार कारवाई.

BCCI ने भारताची लाज काढल्यानंतर अधिकाऱ्यांना आली जाग, संबंधितांवर होणार कारवाई.

  • Published by:  Priyanka Gawde

गुवाहटी, 06 जानेवारी : भारत-श्रीलंका यांच्यात गुवाहटी येथे झालेला पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द झाला. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बारसपारा मैदानावर होणार होता. मात्र पावसामुळे आणि खेळपट्टी ओली असल्यामुळं हा सामना रद्द करण्यात आला.

दरम्यान दोन्ही संघांमध्ये होत असलेला हा टी-20 सामना रद्द झाल्यामुळं बीसीसीआय नाराज आहे. कारण सोशल मीडियावर खेळपट्टी सुकवण्यासाठी हेअर ड्रायर आणि इस्त्री वापरल्यामुळे ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता बीसीसीआयनं मुख्य क्युरेटर आशिष भौमिक यांच्याकडे यासंदर्भात रिपोर्ट मागितली आहे. यासगळ्या प्रकरणात बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत, 'यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यास राज्य क्रिकेट असोसिएशनचा नसलेला अनुभव समोर आला आहे. अशा आव्हानाला कसे सामोरे जावे हे कोणत्याही सहकार्याने शिकवले जात नाही. माझ्या मते, पिच क्यूरेटर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार आहेत’, असे सांगितले. दरम्यान या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

वाचा-BCCI ने भारताची लाज काढली! खेळपट्टी सुकवण्यासाठी वापरली इस्त्री आणि हेअर ड्रायर

या सामन्याचा टॉस झाल्यानंतर पावसाचा जोर वाढला. पंचांनी तीन वेगवेगळ्या वेळी या क्षेत्राचा आढावा घेतला. त्याच वेळी, कर्मचाऱ्यांनी हेअर ड्रायर आणि इस्त्रीने खेळपट्टी कोरडी करताना दिसले. जेणेकरून सामनाही शॉर्ट ओव्हरचा होऊ शकेल. मात्र हे होऊ शकले नाही.

वाचा-पावसामुळं नवीन वर्षातील पहिली टी-20 गेली पाण्यात, भारत-श्रीलंका सामना रद्द

एकीकडे बीसीसीआय हा जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामन्यांमध्ये कधीच अशी अपेक्षा केली जात नाही की पावसाच्या वेळी खेळपट्टीवर ठेवलेले कव्हर फाटलेले असतात आणि तेथील पाणी खेळपट्टीवर जाण्याची शक्यता असते. त्यामुळं खेळपट्टी सुकवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयची खिल्ली उडवली जात होती. एवढेच नाही तर सामना रद्द झाल्याने अनेक माजी क्रिकेटपटूसुद्धा नाराज झाले. व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटलं की, इतका कमी पाऊस पडल्यानंतर सामना रद्द होणं दुर्दैवी आहे. मैदान तयार कऱणाऱ्यांनी सज्ज असायला पाहिजे होतं.

वाचा-'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमलं स्टेडियम, अभिमान वाटावा असा VIDEO

दरम्यान भारत-श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना 7 जानेवारी रोजी इंदूर येथे होणार आहे. त्यामुळे नववर्षातील पहिला सामना रद्द झाल्यानंतर दुसरा सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.

First published: