मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : विराट-शास्त्रींना धक्का, BCCI ने फेटाळली ती मागणी

IND vs ENG : विराट-शास्त्रींना धक्का, BCCI ने फेटाळली ती मागणी

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला अजून सुरुवात झालेली नाही, पण खेळाडूंच्या निवडीवरुन मात्र गोंधळ सुरू असल्याचं चित्र आहे. शुभमन गिलला (Shubhaman Gill) दुखापत झाल्यानंतर टीम इंडियाने दोन ओपनरची मागणी केली होती, पण टीमची ही मागणी पूर्ण होणार नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला अजून सुरुवात झालेली नाही, पण खेळाडूंच्या निवडीवरुन मात्र गोंधळ सुरू असल्याचं चित्र आहे. शुभमन गिलला (Shubhaman Gill) दुखापत झाल्यानंतर टीम इंडियाने दोन ओपनरची मागणी केली होती, पण टीमची ही मागणी पूर्ण होणार नाही. बीसीसीआय (BCCI) शुभमन गिलची जागा भरण्यासाठी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कलला (Devdutt Paddikal) इंग्लंडला पाठवणार नाही. टीम इंडियाने 28 जूनला मॅनेजर गिरीश डोंगरे यांच्यामार्फत मेल पाठवला होता. ओपनर बॅट्समन म्हणून इंग्लंडला दोन खेळाडू पाठवावेत, अशी मागणी या मेलमधून करण्यात आली होती.

निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी दोन दिवसांआधी पर्यंत या मेलला अधिकृतरित्या उत्तर दिलं नव्हतं. निवड समिती अन्य बॅट्समनना इंग्लंडला पाठवू इच्छित नाही, कारण तिकडे आधीपासूनच चार ओपनर आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं, 'पृथ्वी शॉ श्रीलंकेतच राहिल आणि 26 जुलैपर्यंत मर्यादित ओव्हरची सीरिज खेळेल. त्याची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे, त्यामुळे त्याला ती जबाबदारी पार पाडावी लागेल. श्रीलंकेविरुद्धची सीरिज संपल्यानंतर सगळ्या शक्यतांचा विचार केला जाईल, सध्या असं काही होणार नाही.'

इंग्लंडमध्ये टीम इंडियासोबत रोहित शर्मा (Rohit Sharma), मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), केएल राहुल (KL Rahul) हे ओपनर आणि अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Ishwaran) स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून आहे. टीम प्रशासन केएल राहुलला मधल्या फळीत खेळवण्याचा विचार करत आहे, त्यामुळे ओपनिंगला फक्त रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल हे दोनच पर्याय उपलब्ध राहतात. अभिमन्यू इश्वरनच्या तंत्राबाबत टीमला साशंकता आहे, त्यामुळेच त्यांनी आणखी दोन ओपनरची गरज असल्याचं निवड समितीला सांगितलं.

ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते, त्यामुळे टीम इंडियापुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात टीमला हा धोका पत्करायचा नसल्यामुळे त्यांनी आणखी दोन ओपनरची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे.

अभिमन्यू इश्वरनला थ्रोडाऊन तज्ज्ञ राघवेंद्र याचा सामना करण्यातही अडचण येत आहे, त्यामुळे टीम अभिमन्यूला खेळवण्याचा विचार करत नाहीये. अभिमन्यूने स्थानिक क्रिकेटमध्ये 20 शतकं केली आहेत, यात प्रथम श्रेणीमध्ये 13, लिस्ट एमध्ये 6 आणि टी-20 क्रिकेटमध्ये एका शतकाचा समावेश आहे. लिस्ट एमध्ये त्याची सरासरी 40 पेक्षा जास्त आहे.

First published:

Tags: India vs england, Team india, Virat kohli