IPL 2022 च्या हंगामात एकमेकांना भिडणार 10 संघ, BCCI च्या बैठकीत निर्णय

IPL 2022 च्या हंगामात एकमेकांना भिडणार 10 संघ, BCCI च्या  बैठकीत निर्णय

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आणखी दोन टीम वाढतील आणि एकूण टीमची संख्या 10 होईल, अशी शक्यता होती.

  • Share this:

अहमदाबाद, 24 डिसेंबर: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (BCCI) 89 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) गुरुवारी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) झाली. या बैठकीमध्ये आयपीएल मध्ये (IPL) मध्ये खेळवल्या जाणााऱ्या टीमबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. IPL 2022 मध्ये दोन नव्या टीमच्या समावेशावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आणखी दोन टीम वाढतील आणि एकूण टीमची संख्या 10 होईल, अशी शक्यता होती. पण आता बीसीसीआयने दोन नवीन टीम आणण्याचा निर्णय सध्या पुढे ढकलला असून पुढील वर्षी 8, मात्र 2022 मध्ये 10 टीम मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

(हे वाचा-2 बॉलमध्ये हॅट्रिकची जादू करणारा 49 वर्षांचा मुंबईकर होणार 'या' स्पर्धेत सहभागी)

आयपीएलमध्ये 2 टीम वाढवण्याबरोबरच BCCI ने  डोमेस्टिक क्रिकेटपटूंना सुखावणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार महिला आणि पुरुष दोन्ही संघातील फर्स्ट क्लास खेळाडूंना कोरोना काळात (COVID-19 Pandemic) परिणाम झालेल्या देशांतर्गत हंगामासाठी योग्य मोबदला (compensation) देण्यात येणार आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. शिवाय बोर्डाने खेळाडूंसाठी असणारे इन्शूरन्स कव्हर 5 लाखांवरून 10 लाख केला आहे.

आयओसीकडून (IOC) स्पष्टीकरण मिळाल्यानंतर बीसीसीआय 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा याकरता आयसीसीला पाठिंबा देऊ शकते, अशी माहिती पीटीआयने बोर्डाच्या सूत्राच्या हवाल्याने दिली आहे.

First published: December 24, 2020, 4:01 PM IST

ताज्या बातम्या