मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या क्रिकेटपटूला खोटारडेपणा नडला, BCCI ने घातली 2 वर्षांची बंदी

मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या क्रिकेटपटूला खोटारडेपणा नडला, BCCI ने घातली 2 वर्षांची बंदी

जम्मू काश्मीरचा असलेल्या रसिख सलामला बीसीसीआयने अंडर 19 संघातून वगळले असून त्याच्यावर दोन वर्षांची बंदीही घालण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 जून : बीसीसीआयने जम्मू काश्मीरचा असलेल्या रसिख सलाम याला भारताच्या अंडर 19 संघातून बाहेर काढलं आहे. त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या तिरंगी एकदिवसीय मालिकेसाठी रसिख सलामच्या जागी प्रभात मौर्यला घेण्यात आलं आहे. संघाचे नेतृत्व प्रियम गर्गकडे सोपवण्यात आलं आहे.

रसिख सलामवर घालण्यात आलेल्या बंदीबद्दल बीसीसीआयकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. वयाचा खोटा दाखला दिल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असून 15 जुलैला भारतीय संघ इंग्लंडला जाणार असल्याचंही बीसीसीआयने सांगितलं आहे.

जम्मूचा असलेल्या रसिख सलामने विजय हजारे ट्रॉफीत आपल्या गोलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केले होते. या खेळाडूने आपल्या करिअरची सुरूवात जम्मू-काश्मिरच्या संघाकडून केली. जम्मू राज्यातून आयपीएल खेळणारा रसिख हा चौथा खेळाडू ठरला होता. त्याआधी मिथुन मन्हास, परवेज रसूल आणि मंजूर डार या जम्मूच्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची संधी मिळाली होती.

दक्षिण काश्मिरच्या कुलगाम या छोट्या गावातून विजय हजारे ट्रॉफी गाजवणाऱ्या या नवख्या खेळाडूला यंदाच्या लिलावात मुंबईने 20 लाखांना विकत घेतले. विजय हजारे करंडक स्पर्धेत राजस्थान विरोधात केलेल्या आक्रमक गोलंदाजीनंतर मुंबई संघाने ट्रायल करिता रसिखला मुंबईला बोलवले होते. त्यानंतर दिल्ली विरूद्धच्या सामन्यात रसिख सलामनं पदार्पण केले. 17व्या वर्षी पर्दापण करणारा रसिख सगळ्यात तरुण खेळाडू ठरला होता.

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

VIDEO : ...तर लाज का वाटते, उद्धव ठाकरेंचा ओवेसींवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 03:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading