मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

BBL : आता बॉलरलाही मिळणार Free Hit! असा असणार क्रिकेटचा नवा नियम

BBL : आता बॉलरलाही मिळणार Free Hit! असा असणार क्रिकेटचा नवा नियम

क्रिकेटचा खेळ आणखी रोमांचक करण्यासाठी वेगवेगळे नियम (Cricket Rules) केले जातात. टी-20 क्रिकेट (T20 Cricket) लोकप्रिय झाल्यानंतर तर असे अनेक नियम क्रिकेट चाहत्यांना बघायला मिळाले आहेत. फ्री हिटचा (Free Hit) नियमही त्यातलाच एक.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 7 ऑक्टोबर : क्रिकेटचा खेळ आणखी रोमांचक करण्यासाठी वेगवेगळे नियम (Cricket Rules) केले जातात. टी-20 क्रिकेट (T20 Cricket) लोकप्रिय झाल्यानंतर तर असे अनेक नियम क्रिकेट चाहत्यांना बघायला मिळाले आहेत. फ्री हिटचा नियमही त्यातलाच एक. बॉलरने जर नो बॉल टाकला तर बॅट्समनला पुढच्या बॉलला फ्री हिट (Free Hit) मिळतो. या बॉलवर बॅट्समन रन आऊट वगळता कोणत्याही प्रकारे आऊट होऊ शकत नाही, म्हणजेच बॅट्समनला मोठा शॉट मारण्यासाठी विकेट जायचा धोका नसतो. अशाच प्रकारचा फ्री हिट आता बॉलरनाही मिळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातली टी-20 लीग असलेल्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) बॉलरनाही फ्री हिट द्यायचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. काय असणार नियम? या प्रस्तावामध्ये बॉलरला फ्री हिट कधी मिळेल हे सांगण्यात आलं आहे. बॅट्समनने टाईम आऊट केलं तर बॉलरला फ्री हिट मिळेल. बॅट्समन जर वेळेमध्ये खेळपट्टीवर पोहोचला नाही, बॉलरला फ्री हिट देण्यात यावा. बॉलरला फ्री हिट मिळाल्यानंतर बॅट्समनने बाजूला उभं राहावं, ज्यामुळे बॉलरला तिन्ही स्टम्प दिसतील. बॉलरने टाकलेला बॉल स्टम्पला लागला, तर बॅट्समनला आऊट दिलं जाईल. हा प्रस्ताव पास झाला तर यंदाच्या बिग बॅश लीगमध्ये (BBL) बॉलरसाठीचा फ्री हिटचा (Free Hit for Bowlers) नियम लागू होईल. सध्याच्या नियमानुसार विकेट गेल्यानंतर किंवा बॅट्समन रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर पुढच्या बॅट्समनने 3 मिनिटांमध्ये खेळपट्टीवर येणं बंधनकारक आहे. बिग बॅश लीगमध्ये ही वेळ 75 सेकंद म्हणजेच दीड मिनीट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. बिग बॅश लीगचे भलतेच नियम बिग बॅश लीगच्या 2018-19 च्या मोसमात टॉसचा 141 वर्ष जुना नियम बदलला गेला. त्या मोसमापासून टॉसवेळी नाणं उडवण्याऐवजी बॅट उडवायला सुरुवात झाली.
First published:

Tags: Australia, Cricket, T20 cricket

पुढील बातम्या