Home /News /sport /

विराटच्या सहकाऱ्याचा धमाका, 100 व्या मॅचमध्ये ठोकलं शतक, फोर-सिक्स मारूनच केले 112 रन!

विराटच्या सहकाऱ्याचा धमाका, 100 व्या मॅचमध्ये ठोकलं शतक, फोर-सिक्स मारूनच केले 112 रन!

ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell)बुधवारी टी-20 क्रिकेटमधली त्याची आणखी एक उत्कृष्ट खेळी केली. बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League 2021-22) मेलबर्न स्टार्सकडून खेळताना मॅक्सवेलने होबार्ट हरिकेन्सविरुद्ध शानदार शतक केलं.

    मेलबर्न, 19 जानेवारी : ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell)बुधवारी टी-20 क्रिकेटमधली त्याची आणखी एक उत्कृष्ट खेळी केली. बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League 2021-22) मेलबर्न स्टार्सकडून खेळताना मॅक्सवेलने होबार्ट हरिकेन्सविरुद्ध शानदार शतक केलं. मॅक्सवेलची बिग बॅश लीगची ही 100 वी मॅच होती. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मॅक्सवेल विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीकडून (RCB) खेळताना दिसेल. मॅक्सवेलचं या बिग बॅश लीगमधलं हे दुसरं शतक आहे. त्याने फक्त फोर आणि सिक्स मारूनच 112 रन केले. मॅक्सवेलने त्याचं शतक 41 बॉलमध्ये पूर्ण केलं. बिग बॅश लीगच्या इतिहासातलं हे दुसरं सगळ्यात जलद शतक आहे. सगळ्यात जलद शतकाचं रेकॉर्ड क्रेग सिमन्सच्या नावावर आहे. 2014 साली त्याने पर्थ स्क्रॉचर्सकडून खेळताना ऍडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध 39 बॉलमध्ये शतक केलं होतं. ओपनिंगला बॅटिंगला आलेला मॅक्सवेल या सामन्यात अखेरपर्यंत आऊट झाला नाही. मॅक्सवेलने त्याच्या पहिल्या 100 रनमध्ये 14 फोर आणि 3 सिक्स मारल्या, म्हणजेच 74 रन त्याने बाऊंड्रीच्या मारूनच केल्या. 18 व्या ओव्हरला लागोपाठ 5 फोर ग्लेन मॅक्सवेलने इनिंगच्या 18 व्या ओव्हरमध्ये संदीप लामिछानेच्या पहिल्या 5 बॉलला लागोपाठ 5 फोर मारल्या आणि सहाव्या बॉलवर 2 रन काढले. 64 बॉलमध्ये 154 रन करून मॅक्सवेल नाबाद राहिला. मॅक्सवेलच्या या खेळीमध्ये 22 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. टी-20 करियरमधला मॅक्सवेलचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी नाबाद 145 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. मॅक्सवेलच्या या खेळीमुळे त्याच्या टीमने 2 विकेट गमावून तब्बल 273 रन केले. बिग बॅश लीगच्या इतिहासातला कोणत्याही टीमचा हा सर्वाधिक स्कोअरही आहे. याआधी मागच्या वर्षी सिडनी थंडरने सिडनी सिक्सर्सविरुद्ध 232 रन केले होते. टी-20 मधलं 5वं शतक ग्लेन मॅक्सवेलचं टी-20 करियरमधलं हे 5 वं शतक आहे. याआधी त्याने 319 इनिंगमध्ये 28 च्या सरासरीने 7,565 रन केल्या आहेत. यात 4 शतकं आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. म्हणजेच त्याने 50 व्यांदा 50 पेक्षा जास्तचा स्कोअर केला आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 150 चा आहे. ऑफ स्पिनर असलेल्या मॅक्सवेलने टी-20मध्ये 119 विकेटही घेतल्या आहेत. मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) जिंकवून देणाऱ्या टीममध्येही होता. 79 टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये त्याने 1,844 रन केले, यात 3 शतकं आणि 9 अर्धशतकं आहेत. तसंच त्याने 33 विकेटही मिळवल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Glenn maxwell

    पुढील बातम्या