मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /याने तर कहरच केला! T20 लीगच्या इतिहासात 4 ओव्हरमध्ये दिले सर्वाधिक रन

याने तर कहरच केला! T20 लीगच्या इतिहासात 4 ओव्हरमध्ये दिले सर्वाधिक रन

टी-20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) बॉलरना एक चूकही महागात पडते. बॉलचा टप्पा जरादेखील चुकला तरी बॉल बाऊंड्रीच्या बाहेरच जातो. अनेकवेळा एक सामना खेळाडूचं करियर बदलवून टाकतो. बिग बॅश लीगच्या (BBL 2021) या मोसमात 24 वर्षांच्या लियाम गुथरीला (Liam Guthrie) देखील असाच अनुभव आला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 27 डिसेंबर : टी-20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) बॉलरना एक चूकही महागात पडते. बॉलचा टप्पा जरादेखील चुकला तरी बॉल बाऊंड्रीच्या बाहेरच जातो. अनेकवेळा एक सामना खेळाडूचं करियर बदलवून टाकतो. बिग बॅश लीगच्या (BBL 2021) या मोसमात 24 वर्षांच्या लियाम गुथरीला (Liam Guthrie) देखील असाच अनुभव आला आहे. ब्रिस्बेन हिटचा (Brisbane Heat) हा डावखुरा फास्ट बॉलर टी-20 इतिहासातला सर्वाधिक रन देणारा खेळाडू ठरला आहे. गुथरीच्या 4 ओव्हरमध्ये मेलबर्न स्टार्सने (Melbourne Stars) 70 रन ठोकले. त्यामुळे लियाम बिग बॅश लीगच्या इतिहासातला सगळ्यात महागडा बॉलर ठरला.

लियामच्या 24 बॉलवर मेलबर्नच्या बॅटरनी 7 सिक्स आणि 2 फोर मारल्या, म्हणजेच 50 रन बाऊंड्रीच्या माध्यमातूनच आल्या. लियाने 17.50 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. त्याला दोन विकेट घेण्यात यश आलं असलं तरी त्याची कामगिरी निराशाजनक झाली. मेलबर्न स्टार्सनी या सामन्यात पहिले बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 207 रन केले.

लियामच्या आधी बिग बॅश लीगमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक रन द्यायचा विक्रम बेन ड्वासुईसच्या नावावर होता. त्यानेदेखील मागच्या वर्षी मेलबर्न स्टार्सविरुद्ध 4 ओव्हरमध्ये 61 रन दिले होते. यानंतर डॅनिएल वॉरेलने 2014 साली 4 ओव्हरमध्ये होबार्ट हरिकेन्सविरुद्ध 60 रन दिले होते. बेन लॉफलिंगने 60 आणि थिसारा परेराने 59 रन दिले होते.

मेलबर्न स्टार्सकडून ओपनर जो क्लार्कने 44 बॉलमध्ये सर्वाधिक 85 रन केले, यात 7 सिक्स आणि 5 फोरचा समावेश होता. याशिवाय हिल्टन कार्टराईटनेही 44 बॉलमध्ये 79 रनची खेळी केली. कार्टराईटच्या इनिंगमध्ये 8 सिक्स आणि एक फोर मारली. या सामन्यात स्टार्सची सुरुवात खराब झाली. मार्कस स्टॉयनिस दुसऱ्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. यानंतर जो बर्न्स आणि ग्लेन मॅक्सवेलही स्वस्तात आऊट झाले.

मेलबर्न स्टार्सनी 16 रनमध्येच 3 विकेट गमावल्या होत्या, यानंतर जो क्लार्क आणि हिल्टन कार्टराईटने आक्रमण केलं. गुथरीने टाकलेल्या 7व्या ओव्हरमध्ये दोघांनी 20 रन काढले. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 74 बॉलमध्ये रेकॉर्ड 151 रनची पार्टनरशीप झाली. या पार्टनरशीपमुळे मेलबर्नने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 207 रन केले.

First published: