सिडनी, 23 जानेवारी : बिग बॅश लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथची फटकेबाजी सुरू आहे. सलग दोन शतके झळकावल्यानंतर तिसऱ्या सामन्यातही स्मिथने धावांचा पाऊस पाडला. अवघ्या २२ चेंडूत त्याने अर्धशतक केलं तर 33 चेंडूत 66 दावा कुटल्या. यात एका चेंडूवर 16 धावा काढण्याची कामगिरीही त्याने केली.
सामन्याच्या दुसऱ्या षटकात स्मिथने एकाच चेंडूवर 16 धावा केल्या. जोएल पेरिसने त्याच्या षटकात तिसरा चेंडू नो बॉल टाकला. यावर स्मिथने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार मारला. नो बॉल असल्याने या चेंडूवर स्मिथला फ्री हिट मिळाला. या दबावात पुढचा चेंडू पेरिसने वाइड टाकला. हा चेंडू विकेटकिपर अडवू शकला नाही आणि सिडनी सिक्सर्सला पाच धावा आणखी मिळाल्या. चेंडू वाइड असल्याने पुढच्या चेंडूवर स्मिथने लेग साइडला एक चौकार मारला आणि पेरिसचा एक चेंडूही पूर्ण झाला. त्याच्या या एका चेंडूत सिडनी सिक्सर्सने 16 धावा वसूल केल्या. यापैकी 10 धावा स्मिथच्या खात्यात जमा झाल्या.
हेही वाचा : 26 जानेवारीला ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्याचे आयोजन, एश्ले गार्डनर भडकली
स्टिव्ह स्मिथने 66 धावांच्या खेळीत 4 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने या धावा काढल्या. यंदाच्या बिग बॅश लिगमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याची कामगिरीसुद्धा स्टीव्ह स्मिथने केली आहे.
16 runs from a single legal ball in BBL.pic.twitter.com/wQHGblmGKo
— Johns. (@CricCrazyJohns) January 23, 2023
याआधी सलग दोन शतके करणाऱ्या स्मिथने एडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध 56 चेंडूत 101 धावा केल्या होत्या. त्यात 5 चौकार आणि 7 षटकार मारले होते. तर दुसरं शतक सिडनी थंडर्सविरुद्ध केलं होतं. यात त्याने 66 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकारांसह 125 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket